Home भंडारा विद्यार्थ्यांचा शत्रू हा आळस आहे – आ. नाना पटोले

विद्यार्थ्यांचा शत्रू हा आळस आहे – आ. नाना पटोले

155

आशाताई बच्छाव

1001552173.jpg

विद्यार्थ्यांचा शत्रू हा आळस आहे – आ. नाना पटोले

मुलांनो आरोग्य क्षेत्रात भरारी घ्या – खा. डॉ. प्रशांत पडोळे • साकोलीत १० – १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

संजीव भांबोरे
भंडारा -विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा शत्रू हा आळस आहे, आपल्या यशाच्या दिशेने जो मेहनतीने कार्य करतो तो नक्कीच यशस्वी भवं होतो” असे प्रतिपादन आमदार नाना पटोले यांनी साकोलीत ( शनि. ३१ मे ) ला क्षेत्रातील १० व १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमात केले. प्रसंगी खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी सांगितले की, मुलांनो आपण आरोग्य क्षेत्रातही उच्च शिखर गाठण्यासाठी विशेष प्रयत्न करा व रूग्णांची सेवाही करा कारण आज मेडीकल कॉलेज क्षेत्रात मुलींनाही भरपूर संधी उपलब्ध आहेत. येथे सुमारे ३६० विद्यार्थ्यांचा गौरव चिन्ह व प्रमाणपत्र देऊन शानदार सत्कार समारोह संपन्न झाला.
शनिवारी साकोली तालुका कॉग्रेस वतीने “गुणवंत १०, १२ वी विद्यार्थ्यांचा आणि एमपीएससी प्राविण्य प्राप्त खेळाडूंचा सत्कार” कार्यक्रमात खा. डॉ. प्रशांत पडोळे, आमदार नाना पटोले, उपविभागीय अधिकारी अश्विनी मांजे, तहसिलदार निलेश कदम, जिपस शितल राऊत, नारायण वरठे, पं.स. सभापती डॉ. हेमणे, छाया पटले, सविता ब्राह्मणकर, उपसभापती वालदे, सरपंच नंदू कावळे, पुष्पा कापगते आदी उपस्थित होते. साकोली क्षेत्रातील सुमारे १० वी, १२ वीतील गुणवंत ३६० विद्यार्थ्यांचा येथे गौरव चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यासोबतच एमपीएससी प्राविण्य प्राप्त खेळाडूंचाही शानदार सत्कार सोहळा पार पडला. येथे साकोली शहर आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पालकवर्ग असा हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी होते. प्रास्ताविक तालुका अध्यक्ष डॉ. अशोक कापगते यांनी केले. सोहळ्याला संचालन शहराध्यक्ष दिलीप मासूरकर यांनी कार्य सांभाळले. तर आभार प्रदर्शन तालुका महिला कॉंग्रेस अध्यक्षा छाया पटले यांनी केले.
सदर सत्कार समारंभात उपाध्यक्ष दिलीप निनावे, सचिव विजय साखरे, क्रिष्णा हुकरे, गोलू धुर्वे, विनोद भेंडारकर, आनंद नागोसे, स्वीय सहाय्यक उमेश भेंडारकर, एच. बी. भेंडारकर, जे. डी. मेश्राम, रमेश घरडे, दिलीप झोडे, हेमंत भारद्वाज, प्रसेनजीत राऊत, ओमकार कापगते, दर्यावर डोंगरे, प्रकाश करंजेकर, पराग कोटांगले, लिनप्रकाश राऊत आणि सर्व महिला कॉंग्रेसच्या, युवक काँग्रेस व कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्य केले.

Previous articleशिंदखेडा शहरातील वीज पुरवठा सुव्यवस्थित करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळा
Next articleआनंदाची प्राप्ती हिच खरी यशप्राप्ती
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.