Home बुलढाणा EXCLUSIVE ‘गांजाचा धूराळा !’ उदयनगरात 11 किलो गांजा हस्तगत ! – एका...

EXCLUSIVE ‘गांजाचा धूराळा !’ उदयनगरात 11 किलो गांजा हस्तगत ! – एका आरोपीसह 2 लाख 20 हजाराचा गांजा जप्त !

111

आशाताई बच्छाव

1001547671.jpg

EXCLUSIVE ‘गांजाचा धूराळा !’ उदयनगरात 11 किलो गांजा हस्तगत ! – एका आरोपीसह 2 लाख 20 हजाराचा गांजा जप्त !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
अमडापूर :- बुलडाणा जिल्ह्यात शहरासह काही ठिकाणी गांजा विक्री होत असून, अमडापूर पोलीसांनी चिखली तालुक्यातील उदयनगरात एका आरोपीच्या घरातून तब्बल 11 किलो 20 ग्रॅम गांजा जप्तीची कारवाई 28 मे रोजी केली आहे. या जप्तीच्या गांजाची किंमत एकुण 2 लाख 20 हजार 400 रुपये इतकी आहे. महेश राजेंद्र महानकार (25) रा. इंदिरानगर वॉर्ड नंबर 4, उदयनगर, ता. चिखली, जि. बुलढाणा असे आरोपीचे नाव आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात अमडापूर हद्दीत गांजा जप्तीची कारवाई एलसीबीच्या पथकाने केली आहे. आरोपी महेश राजेंद्र महानकार रा. इंदिरानगर येथील घरात गांजा नामक अंमली पदार्थ अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने आढळून आला. पथकाने आरोपीला ताब्यात घेऊन 11 किलो 20 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. आरोपी विरुद्ध कलम 8 (C), 20 (II), (B) NDPS नुसार गुन्हा दाखल करून अमडापूर पोलिसांकडे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे. एपीआय संजय मातोंडकर, एचसी गणेश पाटील, चाँद शेख
पीएन युवराज राठोड, पीसी दीपक वायाळ, विजेता पवार, ऋषि थूट्टे, हर्षल जाधव, दीपाली चव्हाण, चालक निवृत्ती पुंड, कैलास ठोंबरे या पथकाने ही कारवाई केली.

Previous articleकलेक्टर म्हणाले.. ‘शेतकऱ्यांनो वेळ न दवडता पेरणीची तयारी करा !’
Next articleसमाधी ,संबोधी आणि सदाचार हेच बौद्ध धम्माच्या कुशल कर्माचे अधिष्ठान आहे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.