Home भंडारा जगाला युद्धाची नाहीतर बुद्धाची गरज शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे वक्त्यांनी केले...

जगाला युद्धाची नाहीतर बुद्धाची गरज शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे वक्त्यांनी केले मार्गदर्शन

205

आशाताई बच्छाव

1001497192.jpg

जगाला युद्धाची नाहीतर बुद्धाची गरज
शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे वक्त्यांनी केले मार्गदर्शन

संजीव भांबोरे
भंडारा- जगाला युद्धाची नाहीतर बुद्धाची गरज असल्याचे मत आज दिनांक 12 मे 2025 रोजी बुद्ध जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात वक्त्यांनी मार्गदर्शनातून सांगितले. पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे तथागत गौतम बुद्ध यांची 2587 जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बुद्ध, धम्म,संघ,वंदना घेण्यात आली. दीप प्रज्वलित करून तथागत व बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे तथागत गौतम बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जय जय कार करण्यात आला . यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, शांतीवन बुद्ध विहाराचे संचालक जीवन बोधी बौद्ध, बुद्ध धम्मचारी अयाजी पट्टाचार्य शांतीनगर नागपूर , श्रामनेर बुद्धपाल,माजी उपसरपंच गुलाब घोडसे, अड्याळ येथील पोलीस निरीक्षक धनंजय पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे अशाप्रकारे वक्त्यांनी आपले मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता प्रमोद वासनिक ,प्रशांत बडोले, अश्विन मेश्राम,अंबादास मेश्राम, अर्चना धारगावे ,प्रमोद बिलवणे, कैलास राऊत ,राजकुमार कुर्जेकर, ,सुरेश उके, कुसुम मेश्राम, ज्योती उके, कल्पना मेश्राम, सुरेश मेश्राम, देवला वासनिक, प्रीती बारसागडे, कुंदा देशपांडे कळमना नागपूर यांनी सहकार्य केले.

Previous articleध्यान गौशाळेतील तीघांवर कोर्टाचा अपमान प्रकरणी गुन्हा दाखल
Next articleमेशी परिसरात अवकाळी पावसाचा व वादळाचा तडाखा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.