Home भंडारा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी संविधानाचा अभ्यास करावा – ॲड महेंद्र गोस्वामी

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी संविधानाचा अभ्यास करावा – ॲड महेंद्र गोस्वामी

137

आशाताई बच्छाव

1001493988.jpg

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी संविधानाचा अभ्यास करावा – ॲड महेंद्र गोस्वामी

 

संजीव भांबोरे
भंडारा_विधी सेवा समिती व नगर परिषद पवनी यांच्या संयुक्त विद्यमाने नगर परिषदेच्या अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय संविधानातील मुलभूत अधिकार व मुलभूत कर्तव्ये या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून जेष्ठ विधीज्ञ ॲड महेंद्र गोस्वामी हे होते.
आजच्या स्पर्धेच्या युगात एमपीएससी व युपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी भारतीय राज्यघटनेचा सखोल अभ्यास करणे आवश्यक असून मौखिक व लेखी परीक्षेत संविधानाच्या विषयावर हमखास प्रश्न विचारले जातात.त्यामुळे जर यश संपादन करायचे असेल तर भारतीय संविधानातील मुलभूत अधिकार व कर्तव्ये समजून घ्यावेत,असे आवाहन जेष्ठ विधीज्ञ ॲड महेंद्र गोस्वामी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.
या मार्गदर्शन कार्यशाळेचे संचालन पवनी न्यायालयातील विधी सेविका कु.फाल्गुनी भुरे यांनी केले.तर आभार प्रदर्शन न.प.अभ्यासिकेतील ग्रंथपाल गजानन कोहाट यांनी केले.या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी उपस्थित होते.

Previous articleभोकरदन शहरात विजा व मेघ गर्जनेसह पाऊस . या पावसाचे छायाचित्र टिपले आहे आमचे प्रतिनिधी गजेंद्र लोखंडे यांनी
Next articleखरंच साकोलीत लोक जागृत तरी आहेत काय.? अन्यथा हे असे केले नसते
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.