Home भंडारा निर्भिड पत्रकारी बघता तिसऱ्यांदा आशिष चेडगे भंडारा जिल्हाध्यक्षपदी निवड

निर्भिड पत्रकारी बघता तिसऱ्यांदा आशिष चेडगे भंडारा जिल्हाध्यक्षपदी निवड

90

आशाताई बच्छाव

1001488537.jpg

निर्भिड पत्रकारी बघता तिसऱ्यांदा आशिष चेडगे भंडारा जिल्हाध्यक्षपदी निवड

महाराष्ट्र शासन . प्रा. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या आदेशानुसार व सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी केली ही पुन्हा निवड

संजीव भांबोरे
भंडारा : महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या आदेशान्वये भंडारा जिल्ह्यातील साकोलीचे निर्भिड पत्रकार व दै. युवाराष्ट्र दर्शन प्रतिनिधी आशिष चेडगे यांची बेधडक निर्भिड व जनहितार्थ पत्रकारिता बघता भंडारा जिल्हा अध्यक्षपदी तिसऱ्यांदा त्यांची निवड राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी केली आहे. निर्भय पत्रकार आशिष चेडगे यांचीसलग तिसऱ्यांदा शासनमान्य पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र विशेष करून सोशल मिडीयातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
जनतेच्या न्याय हक्कासाठी, गोरगरीब जनतेचे प्रश्न, भ्रष्टाचाराचे गैरव्यवहाराचे एकुण एक वृत्त आशिष चेडगे यांनी त्यांच्या वृत्तपत्रे आणि सोशल मिडीयातून प्रसारण करीत आज जनतेसमोर सत्य स्थिती आणून मांडलेली आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ कसा निर्भिड पत्रकार असावा, कुणाच्याही पैशाला आकर्षित न होता बेधडकपणे त्यांनी अनेक प्रकरणे प्रकाशझोत आणली आहेत. की जे स्थानिक एका प्रसिद्ध मठ देवस्थानच्या पावती घोटाळा भ्रष्टाचाराची बातमी निर्भिडपणे छापून या एकट्यानेच साकोलीतील जनतेसमोर सत्य उजेडात आणले होते हे आशिष चेडगे यांचे उल्लेखनीय व दमदार कार्य. त्यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघासाठी अनेक वृतमाध्यमांतून पत्रकारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात सोशल मिडीयातून प्रसारण केले होते. याचीच दखल घेत संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांनी आज शुक्रवार ०९ मे रोजी मुंबईहून आदेश देत राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी तिसऱ्यांदा आशिष चेडगे यांची भंडारा जिल्हा अध्यक्षपदी निवड केली आहे.
साकोली उपजिल्हा क्षेत्रातील प्रसिद्ध निर्भिड “साकोली मिडीया” चे मुख्य संचालक व दैनिक युवाराष्ट्र दर्शन साकोली प्रतिनिधी आशिष चेडगे यांनी तिसऱ्यांदा शासनमान्य पत्रकार संघाचे भंडारा जिल्हा अध्यक्षपद कायम राखले त्याबद्दल त्यांचे राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, विदर्भ महासचिव शेखर बोरकर, जिल्हा सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. सुरज गोंडाने, भंडारा जिल्हा प्रभारी डॉ. अक्षय कहालकर, युवाराष्ट्र दर्शन भंडारा जिल्हा प्रतिनिधी विलास सुदामे, प्रा. प्रेमानंद हटवार लाखांदूर तालुकाअध्यक्ष, प्रशांत शहारे पवनी तालुका अध्यक्ष, ऋग्वेद येवले साकोली शहराध्यक्ष, सचिव मनिषा काशिवार, सदस्यगण ताराचंद कापगते, राशिद कुरैशी, रवि भोंगाणे, किशोर रंगारी, यशवंत कापगते, मदन कमाने, संपादक डी. जी. रंगारी आणि व्हीआयपी मिडीयाचे अनिल कापगते, महेश पोगळे, किशोर बावणे आदींनी आशिष चेडगे यांचे सहर्ष स्वागत करीत अभिनंदन केले आहे.

Previous articleमाझा मुलगा मृतक तपिस यांना न्याय द्या -न्यायासाठी आई-वडील रस्त्यावर
Next articleजिल्ह्यात आठवडाभरात ११२ अवैध धंद्यावर गुन्हे शाखेचे छापे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.