Home भंडारा माझा मुलगा मृतक तपिस यांना न्याय द्या -न्यायासाठी आई-वडील रस्त्यावर

माझा मुलगा मृतक तपिस यांना न्याय द्या -न्यायासाठी आई-वडील रस्त्यावर

218

आशाताई बच्छाव

1001488527.jpg

माझा मुलगा मृतक तपिस यांना न्याय द्या -न्यायासाठी आई-वडील रस्त्यावर

वडील दीनदयाल घरडे व आई बेबीनंदा घरडे यांचे 33 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू ,परंतु जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष

भीम आर्मी ने दिला पाठिंबा केली आमरण उपोषणास सुरुवात

पत्रकार संजीव भांबोरे यांनी पीडित परिवाराची घेतली भेट

संजीव भांबोरे
भंडारा -आज दिनांक 9 मे 2025 ला सायंकाळी 7 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील त्रिमूर्ती चौकात सुरू असलेल्या आमरण उपोषणास प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस पत्रकार संजीव भांबोरे यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांची परिस्थिती जाणून घेतली . मुलगा तपिस याला तात्काळ न्याय देण्यात यावा याकरिता मुलाचे आई वडील मागील 33 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेला आहे् 33 दिवसाचा कालावधी लोटला तरी जिल्हा प्रशासनाने अजून पर्यंत दखल घेतलेली नाही. पत्नी बेबीनंदा हिची प्रकृती खालावली असून 8 मे 2025 पासून शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. दीनदयाल घरडे यांची सुद्धा प्रकृती ढासळली असून त्यांना सुद्धा 10 मे 2025 पासून भरती करण्यात येणार आहे. या आमरण उपोषणास भीम आर्मीचे भंडारा जिल्हा प्रभारी विक्रांत भालाधरे यांच्या नेतृत्वात पदाधिकारी यांनी त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून भीम आर्मीने पाठिंबा दिला असून कार्यकर्ते आमरण उपोषणास बसलेली आहेत. समजा या आमरण उपोषणाची प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सुद्धा भीम आर्मीने दिलेला आहे. व मोकाट फिरत असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात यावा .याबाबतचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा, तहसीलदार साहेब भंडारा, मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद भंडारा अध्यक्ष वकील संघ ,पोलीस निरीक्षक भंडारा यांना देण्यात आलेले आहे. यावेळी उपोषण स्थळी प्रामुख्याने पत्रकार संजीव भांबोरे, विक्रांत भालाधरे भंडारा जिल्हा प्रभारी भीम आर्मी ,अश्विन गोस्वामी जिल्हा संपर्कप्रमुख ,प्यारेलाल तिरपुडे भीम आर्मी ,युगांतर मेश्राम भीम आर्मी ,शुभम लोणारे ,महेंद्र बनसोड, चेतन काणेकर, प्रल्हाद वानखेडे ,अंजिराताई रंगारी, अर्चनाताई वानखेडे, मनोज खोब्रागडे, आशिष बोरकर ,शुभम लोणारे , चेतन काणेकर, शुभम मडामे व भंडारा पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleदेवळा तालुक्यातील महालपाटणे पाठोपाठ आता खालप ग्रामपंचायतीत मोठा राजकीय भूकंप
Next articleनिर्भिड पत्रकारी बघता तिसऱ्यांदा आशिष चेडगे भंडारा जिल्हाध्यक्षपदी निवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.