आशाताई बच्छाव
जेवळी बसवरत्न पुरस्कार 2025 चे मानांकन जाहीर
उमरगा प्रतिनिधी: मौजे जेवळी उत्तर ( ता. लोहारा ) येथील प्रती वर्षाप्रमाणे साजरी होणारी ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांची यात्रा दिनांक 27 एप्रिल ते 2 मे या कालावधी साजरी होत आहे. पुरातन ग्राम दैवत, वर्षानुवर्षाची परंपरा या चाली रिती सोबत आधुनिकतेची कास धरून गावपातळी वरील विविध क्षेत्रामध्ये भरीव, आदर्शवत व नावलौकिक कार्य केलेल्या विविध गुणवंताचा जेवळी बसवरत्न पुरस्काराने सन्मानीत करून नव तरूणाच्या समोर आदर्श ठेवण्याचे कार्य श्री बसवेश्वर यात्रा कमिटीने चालू केलेले आहे. विशेषतः महात्मा बसवेश्वर यांच्या वचनाला अनुसरून मानवता हा धर्म या उक्तीला तंतोतंत पालन करून विविध धर्मातील सर्वसमावेशक गुणरत्नाचा जेवळी बसवरत्न पुरस्काराने सन्मानीत केले जात आहेत.
1. श्रीमान दत्तात्रय मडोळे यांना पोलिस दलातील उल्लेखनीय कामगिरीसाठी उत्कृष्ठ पोलिस
2. संशोधन विभातील कार्यासाठी – श्रीमान महेश ढोबळे व कुमारी सिद्धी अपारी धरणे.
3. युवा उद्योजक – श्रीमान धनराज शिंदखेडे व महादेव श्रीमान शिंदखेडे.
4. सामाजीक कार्यासाठी -श्रीमान निळकंठ माणिकशेट्टी.
5. शौक्षणिक क्षेत्रातील आदर्श शिक्षक – श्रीमान आर. व्ही. पाटील सर.
6. युवक प्रेरणादायी व्यक्तिमत्व :श्रीमान अविनाश दांडेकर – नळदुर्ग पोलीस स्टेशन.
7. साहित्य विभाग : रामचंद्र सुमन सुभाष साळुंखे – डोबिवली – जेवळी.
8. युवा शेतकरी, अभियंता : अभिजीत विनायकराव पाटील.
या मान्यवरांचे श्री बसवेश्वर यात्रा कमिटीच्या वतीने सर्वानुमते निवड करण्यात आली असून सदर पुरस्काराचे वितरण दिनांक 2 मे 2025 वार शुक्रवार रोजी सांस्कृतीक सभागृह , मुख्य बाजारपेठ जेवळी उत्तर येथे म. नि. प्र. गुरू गंगाधर महास्वामीजी, श्री बसवेश्वर यात्रा कमिटी,मान्यवर व गावकरी यांच्या उपस्थितीमध्ये सन्मानीत करून यथोचीत गुणगौरव करण्यात येणार आहे.






