Home वाशिम पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध आंदोलन

पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध आंदोलन

165

आशाताई बच्छाव

1001444864.jpg

पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध आंदोलन
पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी
कँडल लावून शहिदांना श्रद्धांजली
वाशिम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ- जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ वाशीम येथे मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले . दरम्यान दिघेवाडी चौक येथे हाती कँडल घेत शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .या निषेध आंदोलनात वाशीम येथील मौलाना यांच्या प्रमुख उपस्थित अनेक सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि मुस्लिम बाँधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .
जम्मू-काश्मीरमधील पर्यटनस्थळ पहलगाम येथे सोमवारी पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला.या केलेल्या क्रूर हल्ल्याचा वाशीम येथील मुस्लिम समाजाच्या वतीने दिघेवाडी चौक येथे दि.२५ एप्रिल रोजी तीव्र निषेध नोंदविण्यात आला.तसेच हाती कँडल लावून हल्ल्यातील सर्व शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.दरम्यान पाकिस्तान मुर्दाबाद, , आतंकवाद मुर्दाबाद,हिंदू मुस्लिम भाई-भाई, हम सब एक है अशा घोषणा देण्यात आल्या.तसेच या पहलगाम घटनेप्रकरणी सरकारने कठोर कारवाई करून अशा दहशतवाद्यांवर कठोर करावाई करावी अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. यावेळी घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी वाशीम येथील मौलाना यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सालार ए उम्मत तंजीम,संभाजी ब्रिगेड, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, बहुजन मुक्ती पार्टी,भारत मुक्ति मोर्चा,माळी मंच,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुस्लिमीन वाशीम यांच्यासह अनेक संघटना आणि राजकीय पक्ष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Previous articleजालना तालुका पोलीस ठाणे हद्दीतील इसमाचा खून करणाऱ्या आरोपीस 02 तासात केले जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Next articleकायमस्वरूपी दारुबंदीसाठी मालेगाव पोलिसांना मुंगळा ग्रामस्थांचे निवेदन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.