आशाताई बच्छाव
जालना तालुका पोलीस ठाणे हद्दीतील इसमाचा खून करणाऱ्या आरोपीस 02 तासात केले जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 27/04/2025
दिनांक 25/0 4/ 2025 रोजी रात्रीच्या सुमारास नरेश उर्फ बंटी नारायण रंजवे राहणार कन्हैया नगर जालना यास कोणीतरी अज्ञात इसमाने देऊळगाव राजा रोडवरील हॉटेल भागीरथी टी हाऊसच्या मागील मोकळ्या जागेत जामवाडी शिवारात जीवे ठार मारले होते सदर इसमाच्या मारेकऱ्यास तात्काळ शोध घेऊन अटक करणे बाबत मा. पोलीस अधीक्षक जालना यांनी श्री पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा जालना यांना सूचना दिली होती.
त्या अनुषंगाने श्री पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा जालना यांनी सदर मारेकर्याचा शोध घेण्यासाठी पथक तयार करून अटक करण्याच्या साठी आदेशित केल्याने सदर मारेकऱ्याचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, मयत नरेंद्र उर्फ बंटी नारायण रंजवे राहणार कन्हैया नगर जालना याचा खुन त्याचा मित्र नामे संदीप ज्ञानेश्वर राऊत राहणार कन्हैया नगर जालना यांने केला असून तो सध्या जामवाडी येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्याचा शोध घेऊन त्यास विचारपूस केली असता त्यांने सांगितले की, आरोपी हा त्याचे भागीरथी टी हाऊस वर असताना मयत नरेश उर्फ बंटी नारायण रंजवे राहणार कन्हैया नगर जालना हा त्यास दारू पाज म्हणून लागला आरोपीने त्यास दारू न पाजल्याने दोघांमध्ये झटापट होऊन मयताने आरोपीच्या आईवर शिवीगाळ केल्याने या गोष्टीचा मनात राग धरून आरोपीने मयतास लोखंडी कुऱ्हाडीने गळ्यावर वार करून त्याचा खून केला. त्या अनुषंगाने पोलीस ठाणे तालुका जालना येथे आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल व मा. पोलीस उपाधीक्षक श्री आयुष नोपानी ,मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक श्री राजेन्द्र वाघ, पोलीस हवालदार सॅम्युएल कांबळे, गोपाल कौशिक, रामप्रसाद पव्हरे ,भाऊराव गायके, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, कैलास खाडे, जगदीश बावणे, संभाजी तनपुरे, सुधीर वाघमारे, सतीश श्रीवास, देविदास भोजने, आक्रुर धांडगे, कैलास चेके, सोपान क्षीरसागर, संदीप चिंचोले, रमेश काळे, किशोर पुंगळे, गणपत पवार ,सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, सर्व स्था.गु.शा. जालना यांनी केली आहे.






