आशाताई बच्छाव
आशिर्वाद नगर (गिरोला ,गट ग्रामपंचायत आंबाडी )येथे सिमेंट रस्ता बांधण्याची मागणी
पावसाळ्याच्या पूर्वी मागणी पूर्ण न झाल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा
संजीव भांबोरे
भंडारा –आशिर्वाद नगर, टोल नाक्याजवळ,–गिरोला, गट ग्राम पंचायत अंबाडी, तह जिल्हा भंडारा येथील रहिवासी मागील पंधरा वर्षांपासून इथे वास्तव करीत आहेत.
छायाचित्रात लोक उभे त्या ठिकाणी , तो एक कच्चा रस्ता आहे, व पावसाळ्यातील 3 महिने हा रस्ता पाण्याखाली असतो, ज्यामुळे नागरिकांना चालत यायला–जायला खूप अवघड होतं. शाळकरी मुले, वृद्ध व्यक्ती, रोजंदारी करणारे कामगार आणि अग्निशमन दल तसेच रुग्णवाहिका या सारख्या इमर्जन्सी सर्व्हिस ला मार्गदर्शन करता येत नाही. प्रशासनाकडे वारंवार विनंती करूनही कोणतीही ठोस कारवाई आजपर्यंत झाली नाही.या अगोदर 5 ते 6 वर्तनपत्रात याविषयी बातम्या प्रकाशित करण्यात आल्या तरी सुद्धा शासन प्रशासन लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत ,
या ठिकाणी हा रस्ता फक्त 200 ते 300 मीटर चा आहे, श्री. कार्तिक पावणकर यांच्या घरापासून श्री. वनवास मेश्राम यांच्या घरापर्यंतचा २०० ते 300 मीटरचा रस्ता सिमेंटने बांधण्याची अधिकारपुर्वक मागणी करत आहेत. फक्त मूलभूत गरजेनुसार हा रस्ता हवा आहे.
२०२५च्या पावसाळ्या आधी हा बांधकाम पूर्ण होऊन आमच्या त्रासात कमी होईल अशी अपेक्षा आहे.अथवा, आम्हाला कडक आंदोलन सुरू करावे लागेल.असे जनतेचे म्हणणे आहे
गावकरी वार्षिक महसुली कर आणि विविध शुल्क वेळेवर भरत आहेत , परंतु जनतेच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत आहे.
सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी देखील परिस्थितीची पाहणी करण्यास टाळाटाळ केली आहे, ज्यामुळे रहिवाशांच्या मनात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. जर प्रशासनाने यंदाच समस्येवर त्वरित तोडगा काढला नाही, तर आम्ही जिल्हाधिकारी, मा. मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे जननायक लोकगौरव अभय डी रंगारी च्या नेतृत्वाखाली आंदोलन करू, याची संबंधित विभागाने नोंद घ्यावी ,
या भागाचे वास्तव आणि त्यातल्या लोकांचे जीवितधोके लक्षात घेवून तात्काळ ही समस्या सोडवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.






