आशाताई बच्छाव
तलाठी व मंडळ अधिकारी संवर्गातील शासनमान्य आर्थिक व सेवा विषयक मागण्या पूर्ण न झाल्याने पुकारलेले आंदोलन जिल्हाधिकारी यांच्या विनंतीवरून तूर्तास स्थगित
25 एप्रिल पासून सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांनी कामावर रुजू होण्याचे संघटनेचे आवाहन
संजीव भांबोरे
भंडारा-विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा शाखा भंडारा व विदर्भ मंडळ अधिकारी संघ नागपूर जिल्हा शाखा भंडारा कडून दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता तसेच दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी दुपारी 1.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा परिषद कक्षात निवासी जिल्हाधिकारी भंडारा तसेच विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा शाखा भंडारा व विदर्भ मंडळ अधिकारी संघ नागपूर जिल्हा शाखा भंडारा चे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव ,पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आंदोलनाबाबत बैठक आयोजित करण्यात आलेली होती .सदर बैठकीमध्ये आंदोलनात्मक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. चर्चेमध्ये आपणाकडून संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांना आंदोलनात्मक विषयावर अस्वस्थ करण्यात येऊन सुरू असलेले आंदोलन मागे घेण्याबाबत आव्हान करण्यात आले.
त्यानुसार विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा शाखा भंडारा व विदर्भ मंडळ अधिकारी संघ नागपूर जिल्हा शाखा भंडाराचे सर्व पदाधिकारी सर्व सभासदांची सभा पटवारी भवन भंडारा येथे दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी घेण्यात आली .तसेच सर्वानुमते असे ठरविण्यात आले की ,जिल्हाधिकारी भंडारा यांनी सकारात्मक चर्चा घडवून आणली व मागण्या नुसार कालावधी देऊन लवकरात लवकर सर्व मागण्या निकाली काढण्याबाबत आस्वाद करून आंदोलन माग घेण्याचे आवाहन केल्याने विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा शाखा भंडारा व विदर्भ मंडळ अधिकारी संघ नागपुर जिल्हा शाखा भंडाऱ्याचे सर्व पदाधिकारी व सभासदांचे अंशतः समाधान करण्यात आले .त्यानुसार जेष्ठता यादी ही 25 एप्रिल 2025 पर्यंत झालेल्या चर्चेनुसार प्रसिद्ध करण्यात यावी व सात आर 7 दिवसात देण्यात यावे, झालेल्या चर्चेनुसार तलाठी व मंडळ अधिकारी यांचे रिक्त पदे जेष्ठता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर 30 एप्रिल 2025 पर्यंत मंडळ अधिकारी यांचे पदोन्नतीचे तसेच तलाठी यांचे न्यायालयीन प्रकरणे वगळता भरण्यात यावी, तलाठी यांचे कार्यालयीन भाडे हे शासन स्तरावरील बाब असल्यामुळे आपल्या कार्यालयाकडून भाडे अनुदान मागणी करण्याकरता पाठपुरावा करण्यात येईल असे सांगण्यात आले ,तलाठी व मंडळ अधिकारी यांना कालबद्ध पदोन्नती व स्थायित्व प्रमाणपत्र देण्याकरिता कॅम्पचे आयोजन तात्काळ करून पंधरा दिवसात देण्यात यावे, 2021 चे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे अति कालीन भत्ता संबंधाने अतिकालीन भत्याकरिता निधीची मागणी करण्यात आली असल्याचे सांगितले, अतिका लीन भत्ता तात्काळ देण्यात यावे ,कालबद्ध झालेले प्रिंटर तसेच नवीन पदनिर्मिती झालेले तलाठी व मंडळ अधिकारी यांना नव्याने लॅपटॉप स्कॅनर प्रिंटर बाबत दिनांक 24 मार्च 2025 चे शासन निर्णयानुसार त्वरित देण्यात यावी ,तसेच नवीन पदनिर्मित झालेले तलाठी व मंडळ अधिकारी यांना आपले कार्यालयात जमा असलेल्या तोशिबा लॅपटॉप मधील सुरळीत असलेले लॅपटॉप तात्पुरत्या स्वरूपात काम करण्याकरता देण्यात यावे ,शासकीय तलाठी कार्यालयीन वीज बिलाची रक्कम काही तलाठी यांनी कामे होण्याच्या दृष्टीने भरलेली आहेत व त्याची बिल ही तहसील कार्यालयाला सादर केलेली आहे त्या बिलाची रक्कम तलाठी यांना देण्यात यावी ,तसेच काही कार्यालयाची विज बिल भरल्या नाहीत त्यामुळे 6 ते 7 महिन्यापासून कपात केलेली आहे ती तात्काळ सुरू करण्यात यावी ,तलाठी व मंडळ अधिकारी यांनी यापूर्वीच विनंती बदली करिता मागील 2 ते 3 वर्षापासून आपणाकडे अर्ज सादर करण्यात आले परंतु आजपर्यंत ही विनंती बदलीबाबत विचार करण्यात आलेला नाही, संबंधित अधिकाऱ्यासोबत झालेल्या चर्चेनुसार सर्व मागण्या दिलेल्या कालावधीमध्ये पूर्ण करण्यात यावे अन्यथा पंधरा दिवसानंतर आंदोलनाची नोटीस न देता आंदोलन पूर्ववत सुरू करण्यात येईल व सदर बाबीला जिल्हा प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील .वरील आव्हानास मान देऊन आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात येत आहे .दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी जिल्ह्यातील आंदोलनात सहभागी झालेले सर्व तलाठी व मंडळ अधिकारी आपल्या कामावर मध्यांना पूर्व रुजू व्हावे असे आव्हान
जिल्हाध्यक्ष शेखर ठाकरे ,राजेश ठाकरे उपाध्यक्ष ,जयंत सोनवाने अध्यक्ष, एम के शेंडे, वसुंधरा वासनिक उपाध्यक्ष, शैलेश उपासे सचिव, विठ्ठल मुंडे सहसचिव ,आर गिरीपुंजे सचिव ,कुमारी एस हलमारे सहसचिव ,गणेश पाटील कोषाध्यक्ष विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा शाखा भंडारा ,गोविंद अंबुले कोषाध्यक्ष विदर्भ मंडळ अधिकारी संघ नागपूर जिल्हा शाखा भंडारा यांनी केलेले आहे.






