Home भंडारा तरूणांनो प्रथम धम्मसेवा करा – पूज्य भदन्त डॉ. धम्मरक्षित

तरूणांनो प्रथम धम्मसेवा करा – पूज्य भदन्त डॉ. धम्मरक्षित

111

आशाताई बच्छाव

1001408076.jpg

तरूणांनो प्रथम धम्मसेवा करा – पूज्य भदन्त डॉ. धम्मरक्षित

साकोलीत तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे शानदार अनावरण कार्यक्रम संपन्न

 

संजीव भांबोरे
भंडारा –तरूणांनो भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वाजत गाजत जल्लोषात अवश्य साजरी करा. पण प्रथम मी महाकारूनिक बौद्ध विहारात स्वच्छ मनाने धम्मसेवा व सेवा प्रदान करीत आहे का.? ही जोपासना करून बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यावर नाही तर डोक्यात घ्या” असे आवाहन पूज्य भदन्त डॉ. धम्मरक्षित यांनी साकोली येथे तालुका स्मारक भूमीत तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते.
शहरात या अनावरण सोहळ्याला उदघाटक पूज्य भदन्त डॉ. धम्मरक्षित, प्रमुख उपस्थिती पूज्य भदन्त महेंद्र रतन व बौद्ध संघ नागपूर, स्मारक समिती अध्यक्ष दिपक साखरे, सभापती शितल राऊत, जि.प.स. मदन रामटेके, अभियंता नरेश गणविर, सुमित शहारे, रा.प.म. वाहतूक नियंत्रण विजय नंदागवळी, अर्चना राऊत, ,अमित वाघमारे चंद्रपूर हे हजर होते. सकाळी नागपूरहून पूज्य भदन्त भिख्खू संघाचे येथे आगमन व स्वागत झाले. त्यांनी असंख्य बौद्ध उपासक उपासिका यांच्या उपस्थितीत महाकारूनिक तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे अनावरण केले. कार्यक्रमात नवनिर्मित तालुका स्मारक भूमि येथे सढळ हाताने मदत करणा-या ४७ दानशुर व्यक्तींचा समितीकडून शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यामध्ये दिपक साखरे, अमोल टेंभुर्ण, एडवोकेट स्मिता मेश्राम, सुरेश राऊत, नित्यानंद मेश्राम, अशोक रंगारी, किशोर राऊत, डी जी रंगारी, धर्मदास नंदेश्वर, पी एस बोदेले,भरत दिरबुडे, हरिभाऊ शहरे, डॉ शंकर बागडे प्रेमलाल बडोले, घनश्याम राऊत, धर्मदास नंदेश्वर कैलास खांडेकर कुमार रामटेके, मनोहर टेंभुर्ण, चंदन मेश्राम, अशा 47 लोकांचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
भदन्त डॉ. धम्मरक्षित व भदन्त महेंद्र रतन यांनी आपल्या उपदेशातून धम्मदिक्षा, बौद्ध धर्म जगातील पहिला प्रचारक धर्म, युवकांना संदेश, धम्मसेवा असे मोलाचे मार्गदर्शन केले. येथे भिख्खू संघाचे भदन्त यांकडून धम्मध्वजाचे पुजन ध्वजारोहण, परित्राण पाठ, अन्नदान, धम्मदेसना, बुद्धवंदना, मैत्रीभोज असे विविध कार्यक्रम पार पडले. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुर्ती संगिता नित्यानंद मेश्राम तर तथागत गौतम बुद्ध यांची स्वर्ण मुर्ती सुरेश चोखोबा राऊत यांकडून प्राप्त झाली. सदर अनावरण सोहळ्याला संचालन व आभार अरूण वालदे यांनी केले.
या शहरात झालेल्या तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या शानदार झालेल्या अनावरण सोहळ्याला तालुका स्मारक भूमि समिती अध्यक्ष दिपक साखरे, उपाध्यक्ष अशोक रंगारी, सचिव ॲड. स्मिता मेश्राम, सहसचिव हरीभाऊ शहारे, तपासनिस नालंदा टेंभुर्णे, सदस्यगण पी. एम. बोदेले, अरविंद राऊत, प्रमोद सिंगाडे, विजय साखरे, प्रसेनजित राऊत, भुषण राऊत, व्यवस्थापक प्रकाश ( सोनू ) राऊत यांसह सल्लागार समितीचे बी. बी. राऊत, भरत दिरबुडे, ऋषी रंगारी, डॉ. किशोर राऊत, डी. ई. रामटेके, वसंता मेश्राम, बी. टी. राऊत, एम. टी. कोचे, सुरेश राऊत, प्रतिमा राऊत, ममता रंगारी , भोला राऊत आणि सर्व बौद्ध उपासक उपासिका हे १२ ते १४ एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त या तीन दिवसीय कार्यक्रमात अथक परिश्रम घेतले.

Previous articleलवकरच वाचा!!अबब…. ऐकावे ते नवलच! या गावात हनुमानचे मंदीरच नाही!!
Next article….काय आहे भानगड;गावात मारुतीचे मंदिरच नाही! मारुती, बजरंगबली, हनुमंताचे गावात नाव घेण्यास बंदी!! वाचा तर मग सविस्तर कुठे आहे ते गाव…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.