आशाताई बच्छाव
लोकशाही दिनालाच नागरिकांच्या निवेदनाला दाखवली केराची टोपली ! जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक ११/०४/२०२५ महिन्याच्या पहिला सोमवार लोकशाही दिन म्हणून साजरा केला जातो.या लोकशाही दिनात नागरिकांच्या समस्या व अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि नागरिकांना होणारा त्रास, वेळ व पैसा वाचावा यादृष्टीने लोकशाहि दिन साजरा केला जातो परंतु जालना जिल्ह्यातील लोकशाही दिन याला अपवाद ठरला असून नागरिकांच्या कोणत्याच अडीअडचणी सुटत नसुन हा केवळ देखावा असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समीतीचे जालना जिल्हाध्यक्ष मा.कृष्णा लहाने यांनी केले आहे.त्यांनी असेही म्हटले आहे की, आपण स्वतः अनेक निवेदने दिलीत व न्यायाची मागणी केली परंतु अजुनपर्यंत न्याय मिळाला नाही.याऊलट आमच्या निवेदनाला अधिकारी व कर्मचारी यांनी दाखवली केराची टोपलीच दाखवली असुन सर्वसामान्य नागरिकांनी न्याय कोणाला मागायचा असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला असल्याचे त्यांनी सांगितले असून त्यांनी याविषयी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.त्यांनी पुढे सांगितले की, जालना येथे महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन हा जिल्हा अधिकारी जालना यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होतो. त्या लोकशाही दिनाला जिल्ह्यातून सर्व, तालुक्यातून, सर्व गावातून अनेक नागरिक आपापल्या समस्या, तक्रारी घेऊन न्याय मिळेल या आशेने येतात आणि लोकशाही दिनात आपल्याला न्याय भेटेल परंतु न्याय काही भेटत नाही! जाफराबाद तालुक्या मधून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष श्री कृष्णा लहाने हे गेल्या दोन ते तीन वर्षापासून ग्रामपंचायत मसरूळ या गाव पातळीवर झालेल्या विकास कामाचे तसेच कामाची चौकशी लावण्यासाठी पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा अधिकारी कार्यालय जालना, तसेच मा. आयुक्तालय , मराठवाडा खंडपीठ संभाजीनगर, यांच्याकडे सुद्धा तक्रार केली आहे. दिनांक ०७/०४/२०२५ सोमवार या तारखेला मा. जिल्हाअधिकारी जालना यांच्याकडे लोकशाही दिनात आपली तक्रार दाखल केली असता जिल्हा अधिकारी साहेबांनी तक्रारीवर सही करून विशेष कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवण्याची सांगितले व विशेष कार्यकारी अधिकारी तुमच्या तक्रारीची दखल घेतील व चौकशी लावतील असे सांगितले त्यानंतर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष श्री कृष्णा लहाने यांनी कार्यकारी अधिकारी, यांच्याकडे आपली तक्रार दाखल केली असता, उलट, हिणवत, कार्यकारी अधिकारी म्हणाले , की या जालना जिल्ह्यामध्ये निगेटिव्हिटी लोकांचे प्रमाण जास्त आहे आणि हे माझ्याकडून होणार नाही मला चौकशी लावता येणार नाही याचा अर्थ असा की, लोकशाही दिन हा नावालाच लोकशाही दिन हा केवळ दिखावा असे नागरिकांची प्रतिक्रिया आहे, लोकशाही दिन दर महिन्याला भरवणे व नागरिकांना हेलपाटे मारायला लावणे! कारण सर्व भ्रष्ट अधिकारी एकमेकांचे मिलीभगत असून सर्वांना ज्याचा- त्याचा हिस्सा (शेर) भ्रष्टाचाराची रक्कम भेटून जाते म्हणून सर्व अधिकारी एकमेकांचे मिंधे असतात अशी उलट सुलट चर्चा जनतेमधून सुरू आहे. न्याय भेटणे हे सर्वसामान्यांच्या , शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या, मजुरांच्या, नशिबातच नाही. न्याय भेटणे हा अशक्य झाला आहे असे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जालना जिल्हाध्यक्ष श्री कृष्ण लहाने यांनी मत व्यक्त केले आहे.आपण याविषयी लवकरच वरिष्ठांकडे याविषयी संपर्क साधणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.






