Home बुलढाणा EXCLUSIVE! एसपींचा मोठा निर्णय ! “आता ऑन द स्पॉट एफआयआर !”

EXCLUSIVE! एसपींचा मोठा निर्णय ! “आता ऑन द स्पॉट एफआयआर !”

119

आशाताई बच्छाव

1001386318.jpg

EXCLUSIVE! एसपींचा मोठा निर्णय ! “आता ऑन द स्पॉट एफआयआर !”
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा वाढत्या गुन्हेगारीवर चाप लावण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी मोठा निर्णय घेतला. आता ऑन द स्पॉट एफआयआर दाखल होणार असून, यासाठी उपाय योजना करण्यात आल्या आहेत. पोलीस स्टेशनला मोबाईल किंवा गोपनीय माहीती द्वारे दखलपात्र अपराध घडल्याची माहीती मिळाली असता लागलीच अधिकारी व कर्मचारी व डी.बी. पथकासह घटनास्थळी लॅपटॉप, स्कॅनर असणारे प्रिंटर असे सरकारी वाहनाने घेऊन पोहचतील.
दखलपात्र अपराध घडल्या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी जावुन तक्रारदार यांच्या तक्रारी नुसार संगणकावर तक्रार नोंदवुन घेतील.
तक्रारदार यांची संगणकावर नोंदविलेल्या तक्रारीची प्रिन्ट काढुन त्यावर तक्रारदार याची सही जागीच घेतील व तक्रारदार यांनी दिलेली तक्रारची प्रत ही स्कॅनरद्वारे पोलीस स्टेशनच्या ईमेल वर पाठवतील. त्यामुळे जलद गतीने तपास होऊन गुन्हेगार पोलिसांच्या गळाला लागतील! मात्र ही उपाय योजना किती यशस्वी होते याचे उत्तर संभाव्य काळात मिळणारच आहे.

Previous articleभोकरदन पोलीस स्टेशनचे पीआय श्री बिडवे साहेब यांच्या अथांग प्रयत्नाने जे पी एल व्हॉलीबॉल स्पर्धेची आज उदघाटन
Next articleBIG BREAKING जिल्हा हादरला..! पुन्हा एक मर्डर; रताळीत खून…३ दिवसापासून होते गायब
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.