आशाताई बच्छाव
प्रचंड वादळ आणि पावसाने पिंपळगाव राजा येथे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-पिंपळगाव राजा खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजामध्ये काल रात्री प्रचंड वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. या अचानक आलेल्या पावसामुळे नैसर्गिक आपत्तीत
नुकसान झाले आहे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः जवारी, कांदा आणि मका पिके जमीनदोस्त झाली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे त्वरित पंचनामे करण्याची मागणी केली आहे,
जेणेकरून त्यांना आवश्यक ती मदत लवकर मिळू शकेल. गावातील शेतकरी आणि स्थानिक नागरिकांनी सरकारने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, संबंधित प्रशासनाने शेतकऱ्यांचे नुकसान लवकरात लवकर जाहीर करून मदतीचे पॅकेज द्यावे, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
शेतकरी विकास मंच शाखा पिंपळगाव राजा






