आशाताई बच्छाव
धक्कादायक ! पत्नीच्या छळाला कंटाळून तलाठ्याची आत्महत्या; व्हाट्सअप वर स्टेटस लिहिले, “माझ्या मृत्यूनंतर माझा चेहरा बायकोला दाखवू नका….”
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा:-संग्रामपूर तालुक्यातील पत्नीच्या नेहमीच्या छळाला कंटाळून संग्रामपूर येथून जवळच असलेल्या तेल्हारा येथील तलाठी शिलानंद तेलगोटे (३९) यांनी आत्महत्या करीत असल्याचे स्टेटस ठेवून घेतला जगाचा निरोप घेतला. सोबतच पत्नीला मेल्यानंतर माझा चेहरा दाखवू नका असेही त्यात म्हटले आहे. यावरून किती टोकाचा छळ झाला असेल याची कल्पना येते. सदर तलाठ्याची पत्नी मुलांसमोर त्यास अश्लील शिवीगाळ करून नेहमी पान-उतारा करत होती. त्यामुळेच आत्महत्या करीत असल्याचे स्टेटसवर तेलगोटे यांनी लिहिले आहे.तेलगोटे यांचा साला प्रवीण गायगोले याला जमीन खरेदी करण्यासाठी तेलगोटे याने व्याजाने पैसे काढून दिले होते.
त्याचा हप्ता व व्याज तेलगोटेच्या पगारातून कटत आहे. प्रवीण मात्र
पगारातून कटत आहे. प्रवीण मात्र पैसे परत करत नसल्याने तलाठी तेलगोटे अस्वस्थ होते. शिवाय गेल्या चार-पाच दिवसापासून मृत तेलगोटे यांनी जेवण सुद्धा केले नव्हते. बायकोकडून होणारा सततचा छळ असह्य झाल्याने तलाठी तेलगोटे यांनी आत्महत्या केली..
पोलिसांनी याप्रकरणी तलाठी तेलगोटे यांची पत्नी प्रतिभा तेलगोटे आणि साल्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे..






