Home नाशिक कौळाणेचे भुमिपुत्र सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक प्रकाश रामचंद्र सावकार यांचे दुःखद निधन

कौळाणेचे भुमिपुत्र सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक प्रकाश रामचंद्र सावकार यांचे दुःखद निधन

171

आशाताई बच्छाव

1001381527.jpg

नाशिक इम्तियाज अतार प्रतिनिधी –  युवा मराठावर प्रेम करणारे मनमिळाऊ शांत व हसमुख स्वभावाचे अधिकारी आमचे स्नेही मुळचे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात असलेल्या कौळाणे येथील शेतकरी कुटुंबातील भुमिपुत्र कै.प्रकाश रामचंद्र सावकार यांनी सटाणा तालुक्यातील मुंजवाड गावी शिक्षण घेत महाराष्ट्र राज्य पोलीस दलात भरती होऊन अकोला.नाशिक.मालेगाव तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणी वरीष्ठ पोलिस निरीक्षक सिनीयर PI.पदावर सेवा केली त्यानंतर सेवा निवृत्ती नंतर देखील त्यांनी जन सामन्यांना न्याय मिळाला ह्या हेतूने नाशिक येथे आपला वकीली व्यवसाय सुरू केला आज दि.०४/०४/२०२५ रोजी पहाटे ०३.३० वाजता त्यांचे दुःखद निधन झाले व ते आपल्यातुन इहलोकाच्या प्रवासाला निघुन गेले व सावकार कुटुंबीयांवर जे दुख कोसळले त्यात युवा मराठा परिवार सहभागी आहे ईश्वर त्यांना दुःख सावरण्याची शक्ती देवो व मृत आत्म्यास शांती देवो त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी बारा वाजता द्वारका अमरधाम नाशिक येथे होईल

शोकाकुल युवा मराठा परिवार महाराष्ट्र राज्य