आशाताई बच्छाव
EXCLUSIVE – ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान..शास्त्रामध्ये खळबळ!’ – बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर लाभ लाटणारे शिक्षक रडारवर ! – शासनाचे शिक्षण आयुक्तांना कारवाईचे आदेश !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा राज्यासह बुलढाणा
जिल्ह्यात शेकडो बनावट दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र
वापरून शिक्षकांनी विविध सवलती व नोकरी
लाटल्याचे आणि खऱ्या दिव्यांगांना लाभापासून वंचित ठेवल्याचे अस्वस्थ चित्र आहे. ‘हॅलो बुलढाणा’ने अनेकदा या बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर वृत्तातून प्रहार केला. दरम्यान आता कुठे शासनाने शिक्षण आयुक्तांना बोगसगिरी करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश दिलेत. त्यामुळे बोगस शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.
शिक्षकांना समाजात प्रचंड आदराचे स्थान आहे. परंतु काही शिक्षकांनी गुरूंची प्रतिमा मलिन जाए. परतु पगारापना गुलपा प्राना नान
केल्याचे दिसते. ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान.. आपण पाहिले कोरडे पाषाण!’ असा प्रकार बोगस शिक्षकांकडून होतोय. जिल्ह्यात विविध भागात अनेक धडधाकट मंडळींनी दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे सोयीच्या जागा, बस प्रवासात सूट, मध्य व इतर लाभ घेतल्याचे प्रकार सुरु आहेत. त्यामुळे खऱ्या दिव्यांगावर अन्याय होत आहे. अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर सरकारच्या योजनांचा लाभ, जसे बदली प्रक्रियेच्या भानगडीतून मुक्तता, इन्कम टॅक्समध्ये सूट, शाळेत अर्धा तास उशिरा येण्याची व लवकर
जाण्याची मुभा, शिवाय दर महिन्याला अतिरिक्त अपंग भत्ता मिळत असल्याने बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभर बोगस अपंग शिक्षकांचे पेव फुटले आहे. अशा बोगसगिरी करणाऱ्या शिक्षकांची तक्रार अशासकीय समितीचे जिल्हा सदस्य चंद्रकांत खरात यांनी करून उच्चस्तरीय तपासणीची मागणी केली आहे. याप्रकरणी अनेक वेळा ‘युवा मराठा ‘ ने वृत्त प्रसारित करून बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचा मुद्दा लावून धरला होता हे विशेष !






