आशाताई बच्छाव
एकोडी येथील मुख्याध्यापक विलास लांजेवार व शिक्षक वृंदाचा ग्रामपंचायत एकोडी च्या वतीने सत्कार
संजीव भांबोरे
भंडारा-शालेय शिक्षण विभाग पंचायत समिती साकोली
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा २ २०२४- २४ स्थानिक स्वराज्य संस्था गट
जिल्हा परिषद हायस्कूल एकोडी शाळेचा द्वितीय क्रमांक आल्या बद्दल एकोडी ग्रामपंचायत चे *सरपंच संजय खोब्रागडे* , शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा ग्रामपंचायत सदस्य *भावेश कोटांगले* , शाळा समिती सदस्य तथा ग्रामपंचायत सदस्य *वैभव खोब्रागडे* , *उपसरपंच रिगण राऊत* यांनी शालेय मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंदानचा स्वागत सत्कार करण्यात आला.
जेव्हा पासून मुख्याध्यापक विलास लांजेवार सर एकोडी शाळेला आलेत तेव्हा पासून शाळेची शास्वत दर्जा उंचावलेला आहे हेच त्याच फळ आहे असे वक्तव्य सरपंच संजय खोब्रागडे यांनी केले.
ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले, वैभव खोब्रागडे उपसरपंच रिगन राऊत यांनी शाळेचा दर्जा वाढविण्यासाठी जे काही सहकार्य लाभेल ते आमच्या पंचायत कडून व वयक्तिक रित्या आम्ही सहकार्य करू असे आपल्या मनोगतात व्यक्त केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुकराम बन्सोड, कुंदा जांभुळकर, आशा बडवाईक, शारदा बावणे, विभा तरोने, रहिला कोचे प्रामुख्याने उपस्थित होते.






