Home भंडारा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघ यांनी कामगार प्रमाणपत्रावर सही करण्याचा दिला नकार

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघ यांनी कामगार प्रमाणपत्रावर सही करण्याचा दिला नकार

140

आशाताई बच्छाव

1001340713.jpg

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघ यांनी कामगार प्रमाणपत्रावर सही करण्याचा दिला नकार

मागील सहा महिन्यापासून बांधकाम कामगारांचे प्रकरण थंड बस्त्यात

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये बांधकाम कामगार मजुरांनी 90 दिवस काम केल्याचे कागदपत्र भरून दिलेले आहे. परंतु त्या प्रमाणपत्रावर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघटना यांनी त्या प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करण्याचा स्पष्ट नकार दिलेला आहे. त्यामुळे मागील सहा महिन्यापासून ग्रामपंचायत अधिकारी बांधकाम कामगारांच्या प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करण्यास टाळाटाळ करीत आहेत. या संबंधात पत्रकार संजीव भांबोरे यांनी दूरध्वनीवरून पहेला येथील ग्रामपंचायत अधिकारी गेडाम यांच्याशी संपर्क केले असता राज्य पातळीवर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघाचे आंदोलन सुरू असल्यामुळे बांधकाम कामगारांच्या प्रमाणपत्रावर सही देता येत नसल्याचे सांगितले. संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना खंडविकास अधिकारी यांनी प्रमाणपत्र देण्याबाबत पत्र दिलेले आहे. परंतु कोणतेही बांधकाम कामगार संबंधाने ग्रामपंचायतला नोंद नसल्यामुळे ग्राम विकास अधिकाऱ्यांनी सदर पत्राला केराची टोपली दाखवली असून खातरजमा करता येत नसल्याचे सांगितले. व उलट ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी खातरजमा शब्दाचे स्पष्टीकरण करण्यासंबंधात गट विकास अधिकारी यांना कळविले आहे. अशी माहिती सुद्धा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी मागितलेली आहे.

Previous articleअड्याळ येथील पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी जनतेला केले आवाहन
Next articleबोधगया येथील महाबोधी महाविहारात कॅमेरा, मोबाईल फोन नेण्यावर बंदी मॅनेजमेंट कमिटीचा निर्णय
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.