Home पुणे पुण्यातील स्वारगेट बसस्थानकामधील तरूणीवर अत्याचार प्रकरणातील आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकामधील तरूणीवर अत्याचार प्रकरणातील आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

207

आशाताई बच्छाव

1001275826.jpg

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकामधील तरूणीवर अत्याचार प्रकरणातील आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
पुणे: ब्युरो चीफ उमेश पाटील
स्वारगेट बस स्थानकावरील बलात्कार प्रकरणातील आरोपीचा मागील गुन्हेगारी इतिहास असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी, दत्तात्रय गाडे, पोलिस असल्याचे भासवून मुलींना फसवायचा. त्याचे राजकीय नेत्यांसह पोलिसांशी पण संबंध असल्याचे आढळले आहे. पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली आहे आणि आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली आहे.
स्वारगेट बस स्थानकावरील बलात्कार प्रकरणातील आरोपी सराईत असल्याचे काही पुरावे तपासादरम्यान समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ‘पीएमपी’, ‘एसटी’ स्थानकांवर रेंगाळत तेथील मुली, तरुणींना आपण पोलिस असल्याचे भासवून जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न त्याने यापूर्वी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. एका प्रमुख पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा तो ‘कार्यकर्ता’ असल्याचेही समोर आले झाले असून, त्याच्या संपर्कात राजकीय व्यक्ती, पोलिस कर्मचारीही असल्याचे प्राथमिक तपासात आढळले.दत्तात्रय रामदास गाडे (वय ३७, रा. गुनाट, शिरूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्याने बलात्काराच्या घटनेव्यतिरिक्तही काही मुलींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यासाठी तो आपण पोलिस असल्याचे भासवायचा. त्याच्या संपर्कात आलेल्या राजकीय व्यक्ती आणि पोलिस कर्मचाऱ्यांकडे चौकशी सुरू करण्यात आली आहे.पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीनुसार, गाडे सातत्याने स्वारगेट एसटी स्टँडवर असावा; त्यामुळे त्याला तेथील पूर्ण माहिती होती. त्याचाच फायदा उठवून त्याने पीडित तरुणीला एसटी स्टँडवरील निर्जनस्थळी नेऊन बलात्कार केल्याचा तर्क लावण्यात येत आहे. स्वारगेट एसटी स्टँडवर महिला, मुलींची छेडछाड होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही पोलिसांकडे येत होत्या. त्या त्या वेळी गस्त घालून, संशयितांची चौकशी करून त्यांना हाकलून देण्यात येत असे. मात्र, हे सराईत गुन्हेगार सातत्याने तेथे येत असल्याने, पोलिसी कारवाईवरही मर्यादा येत असल्याचे खासगीत सांगितले जाते.गाडे हा घटनेच्या दिवशी रात्री किमान दीड-दोनपासून एसस्टी स्टँडवर असल्याचे काही पुरावे पोलिसांना मिळाल्यानंतर त्यानुसार तपासाची चक्रे फिरली. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, त्याच्या घराची झडतीही घेण्यात आली आहे. त्याने कोणाशी संपर्क साधल्यास तातडीने पोलिसांना कळविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. गाडेने याखेरीजही अनेक गुन्हे केले असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. छेडछाडीच्या घटनांमध्ये तक्रारदार पुढे येत नसल्याने त्याचे धारिष्ट्य वाढल्याची शक्यता आहे. गाडेबाबत काही माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.तोंडावर मास्क; तरी पटवली ओळख
स्वारगेट बस स्थानकातील काही सीसीटीव्हींमध्ये तोंडावर मास्क लावलेला आरोपी कैद झाला आहे. मास्कमुळे पोलिसांना त्याची ओळख पटवणे अवघड होते. पोलिसांनी या परिसरातील आणखी सीसीटीव्ही तपासले. खबऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर आरोपीची ओळख पटली.

Previous articleकुरवेल गावातील युवा पिढी प्रगतीच्या मार्गावर,
Next articleजनता विद्यालय सुतारखेडे येथे मराठी गौरव दिन उत्साहात साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.