आशाताई बच्छाव
जनता विद्यालय सुतारखेडे येथे मराठी गौरव दिन उत्साहात साजरा
चांदवड सुनील गांगुर्डे तालुका प्रतिनिधी –महान साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांना अभिवादन करून मराठी गौरव दिन उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विविध लोककलांचे सादरीकरण करण्यात आले. उदा- गायन ,भजन, कीर्तन, हरिपाठ, पसायदान,गणेश स्तुती यातून मराठी भाषेचे महत्व सांगितले गेले. त्यानंतर विद्यार्थ्यांचे मनोगत तसेच संपूर्ण महाराष्ट्र दर्शन घडवणारे नृत्य- मराठमोळ गाणं लाखमोलाच सोन यावर विद्यार्थ्यांनी वेशभूषाद्वारे वाघ्या, मुरळी, कोळी, देवभक्त, वासुदेव, वारकरी, शेतकरी यांचे विविध रूपे साकारली.
तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापिका श्रीम.कांबळे एस एस, श्री.दिगंबर शेळके सर, श्रीम.सुवर्णा पवार मॅडम, श्री.दत्तू सोनवणे सर, श्री.विश्वास पाटील सर, श्रीम.योगिता जाधव मॅडम, श्रीम.प्रमिला ठाकरे मॅडम, श्री शैलेश वाघ सर, श्री.ज्ञानेश्वर जामदार सर, श्री.गायकवाड भाऊसाहेब, उघडे मामा, किशोर मामा यांचे सहकार्य लाभले.






