Home जळगाव कुरवेल गावातील युवा पिढी प्रगतीच्या मार्गावर,

कुरवेल गावातील युवा पिढी प्रगतीच्या मार्गावर,

503

आशाताई बच्छाव

1001275477.jpg

कुरवेल गावातील युवा पिढी प्रगतीच्या मार्गावर,

चोपडा जळगांव प्रतिनिधी: सुरेंद्र बाविस्कर

शून्य पासून विश्व निर्माण कसे करतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे कुरवेल गावातील तरुण, एकाच वर्षी गावातील सहा तरुणांनी सरकारी नोकरीत विविध ठिकाणी स्थान मिळवलेल्या मान्यवराचे स्वागत करण्यात आले यात दोन तरुण मुंबई पोलीस ,म्हणून तर दोन तरुण होमगार्ड , एक तरुण पोस्ट खात्यात ,तर एक तरुण लाल परी चा चालक ,म्हणून नियुक्त मिळाली. विशेष म्हणजे हे सर्वच मुले अतिशय गरीब कुटुंबातील आहेत कुठल्याही राजकीय किंवा सामाजिक सपोर्ट नसतानाही स्वतःच्या मेहनतीवर या तरुणांनी यशाचे शिखर गाठले आहे या तरुणांचा आदर्श येणाऱ्या पिढीने घ्यावा नवीन पिढीला प्रोत्साहन मिळावे यानिमित्ताने ग्रामस्थांनी सत्कार समारंभ ठेवला समारंभ ठिकाणी गावातील समस्त ज्येष्ठ मंडळी

कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोरख तात्या पाटील कुरवेल गावाचे सरपंच सो उषाताई विसावे , माजी पोलिस पाटील,  कुरवेल हायस्कुल कुरवेलचे चेरमन प्रकाश दादा , हरी गुरुजी , राजु सर,  गणेश सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे नियोजन रविद्र कोळी व त्याचे सहकारी राजेंद्र कोळी, कैलास कोळी, विनोद पाटील , हिरु कोळी यांनी केले होते. गावात अशा प्रकारे पहिल्यांदाच कार्यक्रम घेण्यात आला यामुळे गावातील होतकरू मुलांना प्रोत्साहन मिळेल आणि गाव प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल हीच या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले

Previous articleसौ.सायली ताई देशमुख यांच्या मधुर वाणीत मुक्रमाबादेत श्री शिव महापुराण कथेस सुरुवात
Next articleपुण्यातील स्वारगेट बसस्थानकामधील तरूणीवर अत्याचार प्रकरणातील आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.