Home भंडारा कार्यकारी अभियंता महावितरण कंपनीच्या उत्पन्न वाढीसाठी कायदेशीर मार्गाने कार्यवाही करा! न्या. बिजु...

कार्यकारी अभियंता महावितरण कंपनीच्या उत्पन्न वाढीसाठी कायदेशीर मार्गाने कार्यवाही करा! न्या. बिजु बि. गवारे

96

आशाताई बच्छाव

1001211158.jpg

कार्यकारी अभियंता महावितरण कंपनीच्या उत्पन्न वाढीसाठी कायदेशीर मार्गाने कार्यवाही करा! न्या. बिजु बि. गवारे

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) :- स्थानीय महावितरण भंडारा मंडळ लघु प्रशिक्षण केंद्र भंडारा येथे आयोजित जिल्हयातील सर्व विद्युत महावितरण कंपनीच्या कार्यरत आभियंत्यांची सभा आयोजित करण्यात आली. त्या प्रसंगी भंडारा जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायाधीश तथा भंडारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव बिजु बी. गवारे उदगारले की,महावितरण कंपनी सर्व स्तरावर विज पुरवठा करणारी कंपनी आहे. ग्राहकांना विज अखंड पने विज पुरवठा करत असते विज आकारणी शुल्क वसूल करण्यात आले तरच कंपनीचे उत्पादन वाढेल पण काही ग्राहक आकारणी शुल्क देण्यास टाळाटाळ करून धमकावत असतील किंवा ईजा किंवा भांडण करू पहात असतील तर कायदेशीर मार्गाने कार्यवाही करावे असे मार्गदर्शन केले.तर अधिक्षक अभियंता कैलाश गिरी म्हणाले की, महावितरण कंपनीच्या उत्पन्न वाढीसाठी शुल्क वसुली नियोजन आवश्यक आहे, तर कार्यकारी अभियंता सौ. प्रिती फुले म्हणाल्या आकारणी शुल्क वसुली करतांना अडचणी येतातच सामंजस्याने वसुली साठी प्रयत्न करावे पण तोडगा निघत नसेल तरच कायदेशीर कार्यवाही करावे लागेल असा विचार व्यक्त केला.
या लघु प्रक्षिशण केंद्र भंडारा येथे वीज चोरी चे कायदे , वीज वितरण कंपनी मध्ये महसूल कसा वाढवता येईल तसेच विद्युत कायदा कसा अंबालबजावणीत आणता येईल म्हणुन प्रमुख पाहुणे म्हणुन बीजू बा. गवारे यांच्याशी ह्या बाबद् विस्तृत विचार मंथन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिक्षक अभियंता कैलाश गिरी, पकार्यकारी अभियंता (प्रशासकीय) प्रिती फुले, मंडळ चे विधी अधिकारी ऍड.राहुल खंडारे , मंडळ अभियंता गजभिये, लघु प्रक्षिशण केंद्रिय समन्वयक उपकार्यकारी अभियंता अभिलाष सोमकुवर प्रामुख्याने उपस्थीत होते.

Previous articleडी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या ४९ विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड
Next articleअतिक्रमण काढलेल्या दुकानदारांना न्याय मिळवून देण्यासाठी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समिती स्थापन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.