Home उतर महाराष्ट्र अतिक्रमण काढलेल्या दुकानदारांना न्याय मिळवून देण्यासाठी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समिती स्थापन

अतिक्रमण काढलेल्या दुकानदारांना न्याय मिळवून देण्यासाठी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समिती स्थापन

106

आशाताई बच्छाव

1001211163.jpg

अतिक्रमण काढलेल्या दुकानदारांना न्याय मिळवून देण्यासाठी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समिती स्थापन
श्रीरामपूर, दिपक कदम तालुका प्रतिनिधी –शासकीय विश्रामगृह श्रीरामपूर या ठिकाणी 3 फेब्रुवारी सायंकाळी 5:00 वाजता श्रीरामपूर शहरातील काढलेल्या अतिक्रमण धारक व्यापाऱ्यांची माजी आमदार भाऊसाहेब कांबळे माजी नगराध्यक्ष अनुराधाताई अदीक भाजपाचे प्रकाश चित्ते रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये मुन्ना झवर व सर्वपक्षीयांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी अतिक्रमण काढलेल्या दुकानदाराच्या पुनर्वसनासाठी मीटिंगमध्ये प्रमुख्याने सविस्तर चर्चा झाली मीटिंगमध्ये श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या स्थापन करून श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने मोठे जन आंदोलन उभारून श्रीरामपूर शहरातील अतिक्रमण काढलेल्या दुकानदारांना बेघर झालेल्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत संघर्ष चालू ठेवणार असल्याचे मीटिंगमध्ये ठरले
त्यावेळी भाऊसाहेब कांबळे म्हणाले की गांधी पुतळ्या बाजू असणारे जुने कोर्ट ते जिनिंग प्रेस सरकारी फार मोठी जागा आहे त्या जागेमध्ये सरकारने अतिक्रमण काढलेल्या दुकानदाराचे पुनर्वसन केले तर व्यापाऱ्यांचा रोजी रोटीचा प्रश्न सुटेल माजी नगराध्यक्ष अनुराधाताई अदिक म्हणाले की अतिक्रमानामध्ये काढलेल्या दुकानदारांच्या पुनर्वसनासाठी लवकरच आपल्याला श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने शिष्ट मंडळ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पुनर्वसन मंत्री यांची भेट घेऊन श्रीरामपूरकरांच्या व्यथा मांडू भाजपाचे प्रकाश चित्ते म्हणाले की ज्यांचे अतिक्रमणामध्ये दुकाने काढले त्यांनी त्यांचे शॉप ॲक्ट लायसन नगरपालिकेला भरत असलेली कराची पावती स्वतः जवळ ठेवून शासन दरबारी लढावे लागेल तरच न्याय मिळेल रिपाईचे सुभाष त्रिभुवन म्हणाले की बाळाला आपल्या आईचे दूध पिण्यासाठी त्याला रडावे लागते तेव्हा त्याची आई त्याला दूध पाजते म्हणून अतिक्रमण काढलेल्या दुकानदारांना आपल्यावर झालेला अन्याय होत असलेली उपासमार कर्जाचा डोंगर तीव्रपणे शासन दरबारी मांडला तरच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व सरकार आपली दखल घेऊन न्याय देईल मनसेचे बाबा शिंदे यांनी देखील सर्व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी व सर्व पक्षांनी मोठे जन आंदोलन उभारून दुकानदारांना न्याय मिळवून देण्यासाठी एकसंघ व्हावे त्यावेळी मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये यांनी आंदोलनासाठी मर्चंड असोसिएशनचा जाहीर पाठिंबा दिला आहे त्यावेळी मुन्ना झवर उमेश पवार भैय्या भिसे आदींनी मनोगत व्यक्त केले त्यावेळी निलेश ओझा संदीप पवार अहमद शहा वसीम बागवान अर्चना पानसरे अँड सुभाष जंगले छावाचे नितीन पटारे दीपक कदम मोहन आव्हाड मनोज काळे विजय शेलार तसेच व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन सुभाष त्रिभुवन यांनी केले तर आभार गौतम उपाध्ये यांनी मानले

Previous articleकार्यकारी अभियंता महावितरण कंपनीच्या उत्पन्न वाढीसाठी कायदेशीर मार्गाने कार्यवाही करा! न्या. बिजु बि. गवारे
Next articleमोरया फाउंडेशनने हळदी-कुंकू समारंभाचे सातत्य जपले- सौ.स्नेहल खोरे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.