आशाताई बच्छाव
108 श्री हनुमान चालीसा संगीतमय, हवनात्मक पाठ संपन्न.
प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 01/01/2024
जालना शहरात गेल्या 26 वर्षांपासून 31 डिसेंबर रोजी 108 हनुमान चालीसा संगीतमय पाठाचे आयोजन करण्यात येत असून या हनुमान चालीसा पठणाने युवा पिढीला दिशा देण्याचे महत्त्वाचे काम केले जात आहे.या प्रशंसनीय कार्याचा गौरव म्हणून जालना येथील मनोजजी महाराज गौड यांना विप्र फाऊंडेशन जालना तर्फे *विप्र समाज रत्न* पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी भक्तमाळ कथा प्रवक्ते किशोर तिवारी, विप्र फाउंडेशनचे अध्यक्ष रामनिवास गौड, सचिव पवन जोशी, कोषाध्यक्ष नारायण दायमा, जयप्रकाश श्रीमाळी, डुंगरसिंग राजपुरोहित, सुरेश. शर्मा, भगवान दायमा, सत्यनारायण जोशी, सुरेश पारीक, हितेश जोशी, नंदकिशोर दायमा, सुदेश दायमा, गौरव बोरा आदींसह समाज बांधव उपस्थित होते.






