Home उतर महाराष्ट्र सूर्यपुत्र शनीचा जयघोष

सूर्यपुत्र शनीचा जयघोष

110

आशाताई बच्छाव

1001110182.jpg

सूर्यपुत्र शनीचा जयघोष

वर्षारंभी भक्तांची दर्शनासाठी गर्दी; वाहतूक व्यवस्थेचा फज्जा
अहिल्यानगर , कारभारी गव्हाणे प्रतिनिधी -नूतन वर्षारंभनिमित्त शनिशिंगणापूर येथे दिवसभरात तीन लाख भाविकांनी भेट देऊन दर्शनाचा लाभ घेतला. आज दिवसभरात झालेल्या तीन मुख्य आरती सोहळ्यास उपस्थित राहून शनिचौथरा परिसरात सूर्यपुत्र शनिदेव की जय, नामाच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. पोलिस यंत्रणेने वाहतूक व्यवस्थेचे कुठलेच नियोजन केले नसल्याने वाहतूक कोंडी व रस्ता वाहतुकीचा फज्जा उडल्याने सर्वांनाच मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
सरत्या वर्षाला निरोप म्हणून दिवसभरात दोन लाख भाविकांची गर्दी झाली होती. सायंकाळच्या आरतीला २० हजारांहून अधिक भाविक उपस्थित होते. रात्री १२ वाजता शनिचौधन्याला फुलांची सजावट व परिसरात विद्युत रोषणाई
करण्यात आली होती, रात्री १२ वाजता वर्षारंभनिमित्त दर्शन घेण्यासाठी भाविक थांबून होते. अनेक भक्तांनी मूर्वीस तेल अभिषेक, मिठाई वाटप करून आतषबाजी केली. दानशूर भक्तांनी चप्पल, छत्री, वख, तसेच खाऊचे पाकीट वाटप केले.
66 शिर्डीतून निघाल्यानंतर वेगवेगळ्या पोलिस ठाण्याच्या वाहतूक पोलिसांची दंडात्मक कारवाईच्या नावाखाती अडवणूक केली. या मार्गावर वाईट अनुभव आल्याने देवस्थान ट्रस्ट व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे.
माध्यान आरती पुण्यातील गोल्डमॅन सनी वाकचौरे, तर सायंकाळची सूर्यास्त आरती उत्तरप्रदेश राज्यातील निर्भय सिंग यांच्या हस्ते झाली. विश्वस्त समितीचे अध्यक्ष भागवत बानकर व विश्वस्तांनी मानकऱ्यांचा सत्कार केला. पानसतीर्थ प्रकल्प परिसरात नवग्रह मंदिर दर्शन व सुशोभीकरण काम पाहण्यासाठी गर्दी झाली होती.

Previous article108 श्री हनुमान चालीसा संगीतमय, हवनात्मक पाठ संपन्न.
Next articleमाळीवाडा बसस्थानक परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.