Home विदर्भ हिंगोली पोलीसांनी “डी मार्ट “च्या बिलावरून चार दिवसात आरोपी केले जेरबंद पण...

हिंगोली पोलीसांनी “डी मार्ट “च्या बिलावरून चार दिवसात आरोपी केले जेरबंद पण बीडमधील सरपंच प्रकरण आरोपी 22दिवसानतर मोकाट का?

133

आशाताई बच्छाव

1001109320.jpg

हिंगोली पोलीसांनी “डी मार्ट “च्या बिलावरून चार दिवसात आरोपी केले जेरबंद पण बीडमधील सरपंच प्रकरण आरोपी 22दिवसानतर मोकाट का?
हिंगोली, श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ -पोलीस प्रशासनाने औढा नागनाथ तालुक्यातील नागेशवाडी शिवारातील अज्ञात तरुणीच्या खुनप्रकरणातील आरोपीचा शोध केवळ “डी मार्ट” च्या बिलावरून अवघ्या तीन ते चार दिवसात हिंगोली पोलिसांनी लावला आरोपीने अहिल्यानगर जिल्ह्यातील खून करून तरुणीला एका बंद सुटकेसद्वारे औंढा नागनाथ तालुक्यातील नागेश वाडी शिवारात आणून फेकली व आरोपी फरार झाला पण हिंगोली पोलिसांनी औंढा नागनाथ व स्थानिक गुन्हे शाखेने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास यंत्रणा तात्काळ आरोपीच्या दिशेने केवळ “डी मार्ट” च्या बिलावरून सुरू केली होती त्यावरून आरोपीला हिंगोली पोलिसांनी अवघ्या काही दिवसातच पकडण्यात यश मिळाले पण बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील व खडणी प्रकरणातील आरोपी अद्यापही फरारच आहेत हे प्रकरण महाराष्ट्र राज्यातील गेल्या वीस दिवसापासून तापलेले आहे सदरील गुन्ह्याचा तपास नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सीआयडी मार्फत करण्याच्या सूचना गृहमंत्र्यांनी दिल्यानंतर तपास यंत्रणा सीआयडी मार्फत सुरू केली एवढेच नव्हे तर बीड जिल्ह्याच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांची तडकाफडकी बदली करून तपासाला गती मिळावी यासाठी बीड जिल्ह्याला नवीन पोलीस अधीक्षक कावत यांची नेमणूक केली पण अद्यापही या प्रकरणातील आरोपी बाविस दिवसानंतर सीआयडी व जिल्हा पोलीस प्रशासनाला पकडण्यात अपयश आले का? यात काहीतरी वेगळे सुरू आहे असे प्रश्नचिन्ह आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनतेच्या मनात येत आहे त्यावरून लोकांना तपास यंत्रणेतीलपोलीस प्रशासन यांना काही राजकीय दबाव तंत्र आहे की काय असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेच्या मनात सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन व सीआयडी यंत्रणा या प्रकरणात कसून तपास करत आहे म्हणून गेल्या काही दिवसापासून प्रसार माध्यमांसमोर अनेक राजकीय मंत्री लोकप्रतिनिधी हे सांगत असतानाच बीड पोलीस प्रशासन व सीआयडीमार्फत हेच बोलल्या जात आहे पण काही आरोपी अटक केल्यानंतर उर्वरित आरोपी अद्यापही फराळच आहेत असे बोलल्या जात आहे पण केवळ डी मार्ट च्या बिलावरून हिंगोली पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीला पकडण्यात यश मिळवले त्यावरून हिंगोली पोलीस प्रशासन बीड पोलीस प्रशासन व सीईटी पेक्षाही अधिक चांगले काम करून दाखवल्याचे पाहायला मिळत आहे यावरून हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तपास यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी यांना बक्षीस देऊन त्यांच्या कामाचा गौरव केला व पुरस्कारासाठी त्यांचे नाव घेतले गेले आहे यावरून हिंगोली जिल्ह्याचा पोलीस प्रशासनाचे महाराष्ट्र राज्यातील एक कौतुकास्पद काम केल्याचे पाहायला मिळाले .

Previous articleआमदार राजू भैय्या नवघरे पाटील यांच्या संकल्पनेतून पाचव्या वर्षी नवोदय सराव परीक्षा
Next articleभीमाकोरेगाव शौर्य दिनानिमित्त देगलूर येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अभिवादन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.