Home भंडारा नव्या वर्षाला युवकांचा नवा संकल्प सेंदूरवाफा साकोलीत “युवाशक्ती संघटना” स्थापित ; झाले...

नव्या वर्षाला युवकांचा नवा संकल्प सेंदूरवाफा साकोलीत “युवाशक्ती संघटना” स्थापित ; झाले फलकाचे अनावरण

138

आशाताई बच्छाव

1001109264.jpg

नव्या वर्षाला युवकांचा नवा संकल्प

सेंदूरवाफा साकोलीत “युवाशक्ती संघटना” स्थापित ; झाले फलकाचे अनावरण

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) : नविन वर्षाच्या निमित्त येथील युवकांनी एक संकल्प हाती घेतला. युवक कल्याण व सामाजिक प्रश्नांचे तातडीने निराकरण व्हावे करीता बुधवार ०१ जानेवारी २०२५ या नव्या वर्षी येथे “युवाशक्ती संघटना” स्थापित करण्यात आली. याचे सेंदूरवाफा चौकात फलक अनावरण व वृक्षारोपण सोहळा पार पडला.
श्री गजानन महाराज मंदिर, श्री हनुमान मंदिर, तथागत बौद्ध विहार येथे संघटनेच्या युवकांनी पुजा अर्चना केली. महामार्ग पॉलीटेक्निक रोड चौकात फलक अनावरण प्रसंगी ज्येष्ठ नागरिक पांडुरंग काळसर्पे, जगनराव इठोले, संस्थापक अध्यक्ष राधेश्याम मुंगमोडे हे हजर होते. बोलतांना मुंगमोडे यांनी सांगितले की, युवाशक्ती संघटना युवकांची व सर्वधर्मीय सामाजिक संघटना आहे. प्रत्येक शिक्षित होतकरू व कष्टकरी तरूणाला जर न्याय मिळत नसेल तर त्याच्या पाठीशी ही संघटना खंबीरपणे उभे राहून होत असलेल्या अन्यायावर व भ्रष्टाचाराचा बिमोड करीत सर्वसामान्याला न्याय मिळवून देणे हाच या संघटनेचा मुख्य उद्देश आहे. ते म्हणाले की, आज साकोली सेंदूरवाफा क्षेत्रात असंख्य युवा बेरोजगारांची जणू फौज उभी झाली आहे. त्यांना त्यांच्या रोजगाराचा न्याय हक्क मिळवून देणे हाच आमचा सदैव संकल्प राहील असे अध्यक्ष राधेश्याम मुंगमोडे यांनी सांगितले. याप्रसंगी हनुमान मंदिर परिसरात विविध वृक्ष लागवड करून सामुहिक वृक्षारोपण करण्यात आले.
या नविन वर्षाच्या अभिनव सोहळ्याला युवाशक्ती संघटनेचे
प्रभाग प्रमुख तुषार जांभूळकर, सहप्रमुख शुभम गभणे, पंकज झोडे, संघटक, विवेक काशिवार, निखील नेवारे, अक्षय रहांगडाले, विक्रम इटवले, विजय भलावी, विवेक काशिवार, महेंद्र सुर्यवंशी यांसह रोहित टेंभुर्णे, मिलन जांभुळकर, प्रज्वल गभने, नंदकिशोर पटले, धीरज वघारे, सतीश शेंडे, विनोद डोंगरवार, राहुल दाते, सद्दाम अन्सारी, उमाकांत नंदूरकर, मित परमार, लोकेश इटोले, गौरव ठाकरे, रुपेश इटोले, पवन सूर्यवंशी, आशिष डोंगरवार, सुमित धुर्वे, प्रकाश बावणे, किशोर कापगते व सर्व युवाशक्ती संघटनेचे शंभराहून अधिक सदस्यगण आणि नागरीक यावेळी उपस्थित होते.

Previous articleलेंडी धरणग्रस्त एकता संघर्ष समन्वयक समितीचे अध्यक्ष बालाजी पसरगे यांचे सर्वानुमते निवड
Next articleआमदार राजू भैय्या नवघरे पाटील यांच्या संकल्पनेतून पाचव्या वर्षी नवोदय सराव परीक्षा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.