Home भंडारा साकोलीत निघाला परभणी, बीड हत्याकांड तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेधार्थ जनआक्रोश...

साकोलीत निघाला परभणी, बीड हत्याकांड तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेधार्थ जनआक्रोश निषेध मोर्चा

120

आशाताई बच्छाव

1001100462.jpg

साकोलीत निघाला परभणी, बीड हत्याकांड तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेधार्थ जनआक्रोश निषेध मोर्चा

गांधी चौकात मोर्चाचे सभेत रूपांतर : पोलीसांचा चोख बंदोबस्त •

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)साकोली येथे परभणी, बिड हत्याकांड तसेच राष्ट्रनिर्माता, संविधान जनक, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशे व्यक्तीमत्व की ज्यांनी एका पेनाच्या टोकावर भारतीय राज्यघटना लिहीणा-या महामानवांचा गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या अपमानाच्या निषेधार्य व अमरावती येथील आदिवासी युवकांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात सोमवार ३० डिसेंबरला तालुका स्मारक भूमि येथून जनआक्रोश निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे रूपांतर जूने पंचायत समिती राष्ट्रपिता महात्मा गांधी चौक येथे जाहीर सभेत झाले. प्रसंगी साकोली पोलीसांचा महामार्गावर चोख बंदोबस्त ठेवला होता.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती येथून निघालेल्या मोर्चात मोठ्या संख्येने महिला पुरुष एकवटले होते. यात मागण्या १) परभणी येथील शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची मदत देऊन कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी. २) बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देऊन त्यांच्य कुटुंबाला १ कोटी रुपयाची मदत देऊन कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात यावी. ३) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रनिर्माता, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अश्या संविधान रचियते महामानवांचा एकेरी उल्लेख करुन त्यांचा अपमान केल्याबद्दल त्यांना गृहमंत्री पदावरून हटविण्यात यावे. ४) अमरावती येथील आदिवासी युवकावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात योग्य कार्यवाही करण्यात यावी. अश्या मागणीचे फलक मोर्चात झळकले होते. सदर मोर्चा मुख्य महामार्गाने नागझिरा रोड चौक, प्रगती कॉलनी चौक, नगरपरिषद चौक, न्यायालय गोवर्धन चौक मार्गे जूने पंचायत समिती राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन माल्यार्पण करून येथे या वरील घटनेच्या निषेधार्थ जाहीर सभा झाली. सभेला ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते शिवकुमार गणवीर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे कैलास गेडाम, वंचित बहुजन आघाडीचे डी जी रंगारी, अचल मेश्राम, अशोक रंगारी, डी वाय बडोले, ज्येष्ठ नागरिक रूपचंद टेंभूर्णे, चिरंजीव बारसागडे, शितल नागदेवे, विलास मेश्राम, प्रबोधनकार मनोज कोटांगले, भीमसेनेचे स्वपनिल गजभिये, शब्बीर पठाण, युवा नेते परमानंद मेश्राम, दिपक साखरे, तनुजा नागदेवे, आदिवासी संघटनेचे हरीभाऊ येळणे, केशव भलावी, यादोराव गणवीर, पराग कोटांगले, अमोल टेंभूर्णे, ओमप्रकाश गायकवाड, विक्की राऊत यांच्यासह महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, भीमसेना, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, नॅशनल आदिवासी पिपल्स फेडरेशन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, संविधानवादी सामाजिक संघटना आणि सुमारे दोन हजार महिला पुरुष येथे उपस्थित होते.

Previous articleसंतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई वाल्मीक कराडसह चार आरोपींचे बँक खाते सील
Next articleशेती निरोगी तर मानवी आरोग्य निरोगी– आदित्य घोगरे तालुका कृषि अधिकारी पवनी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.