Home भंडारा शेती निरोगी तर मानवी आरोग्य निरोगी– आदित्य घोगरे तालुका कृषि अधिकारी पवनी

शेती निरोगी तर मानवी आरोग्य निरोगी– आदित्य घोगरे तालुका कृषि अधिकारी पवनी

124

आशाताई बच्छाव

1001100473.jpg

शेती निरोगी तर मानवी आरोग्य निरोगी–
आदित्य घोगरे तालुका कृषि अधिकारी पवनी

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)दिवसेंदिवस बदलते वातावरण भौगोलिक परिस्थिती, ऊन, वारा, पाऊस, अतिवृष्टी कीड – रोग इत्यादी नैसर्गिक बदलांचा परिणाम हा मानवी आरोग्य सजीव सृष्टी आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या मातृभूमीवर होत आहे. आणि या बदलांचा एकंदरीत परिणाम आपल्या मातृभूमीवर झाला असून जमिनीचे आरोग्य हे सुदृढ नसून रोगट आहे जमिनीचे आरोग्य बिघडलेली असून आपल्या भूमातेचे आरोग्य बिघडलेली असून आपली भूमाता ही निरोगी नसून रोगी आहे आणि पर्यायाने सजीव सृष्टी सुद्धा निरोगी नसून रोगी आहे आणि याचे एकत्रित कारण म्हणजे वाढती बेसुमार वृक्षतोड रासायनिक खयांचा बेसुमार वापर, कीटकनाशके रासायनिक तणनाशके यांचे अतिवापरामुळे वापरामुळे मातृभूमीचा ऱ्हास झालेला आहे. जमिनीचे संतुलन बिघडलेले असून या मातृभूमीला जिवंत ठेवायचे असेल तर जमिनीला संतुलित आहार त्यामध्ये गांडूळ खत, पालापाचोळा, हिरवळीचे खत, टाकून जमीन निरोगी कशी राहील याकडे लक्ष देणे हे आपल्या सर्व मानवाचे आद्य कर्तव्य आणि त्याकरिता डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अभियानाच्या माध्यमातून मातृभूमीला वाचवा आणि मानवी आरोग्य जपा या प्रेरणेतून नैसर्गिक शेती मिशन अभियानाची सुरुवात झाली.

दिनांक 30 डिसेंबर 2024
आसगाव येथील आयोजित प्रशिक्षणा संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना आदित्य घोगरे तालुका कृषी अधिकारी बोलत होते. डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अभियानाच्या माध्यमातून पवनी तालुक्यात एकूण ५०० हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेती मिशन अभियान माध्यमातून जनजागृती करण्याचे काम कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.
मागील वर्षीपासून सुरू करण्यात आले शेतकऱ्यांनी दुसऱ्यावर अवलंबून न राहता नैसर्गिक शेती मिशन अभियानाच्या माध्यमातून बांधावरील प्रयोगशाळा, दहा ड्रम थेरी, च्या माध्यमातून जीवामृत, बिजामृत, दशपर्णी अर्क, ट्रायकोडर्मा इत्यादी नैसर्गिक निष्ठांचे उत्पादन करून शेतकऱ्यांनी स्वावलंबी म्हणून शाश्वत आणि चांगल्या गुणवत्तेचे उत्पादन घ्यावा असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी आदित्य घोगरे प्रशिक्षणासंदर्भात शेतकरी बांधवाना करीत होते.

नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून शेतकरी शेतकरी गट आणि गटांतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी या सर्व गोष्टी या अभियानामध्ये अंतर्भूत असून हे अभियान तीन वर्षे सुरू असून या अभियानांतर्गत भंडारा जिल्ह्यामध्ये 4500 हेक्टर मिळून 90 शेतकरी गट आणि नऊ शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करून येणारे उत्पादन हे शाश्वत चांगल्या गुणवत्तेचे असून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाचे पॅकेजिंग, ब्रॅण्डिंग, शेतीचे प्रमाणीकरण करून मार्केटिंग करून ग्राहकांना विषमुक्त रसायनमुक्त उत्पन्नाचा पुरवठा करणे आणि शेतीला होणारा उत्पादनासाठी लागणारा खर्च कमी करून पर्यावरणाचा रास कमी करून सजीव सृष्टीला जिवंत ठेवणे मातृभूमीला जिवंत ठेवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.

सदर गाव पातळी प्रशिक्षणाचे आयोजन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, पवनी सतीश वैरागडे यांनी केले तर सदर कार्यक्रमाला मंडळ कृषी अधिकारी दिनेश काटेखाये, कृषी पर्यवेक्षक आनंदजी खोब्रागडे, कृषी सहायक राकेश वंजारी आणि महात्मा फुले नैसर्गिक शेती किसान चौरास शेतकरी गट गटातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रशिक्षणासंदर्भात तज्ञांचे मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांचे मनोगत उपस्थिततांनी ऐकून घेतले.
सदर प्रशिक्षणाचे प्रास्ताविक तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतिश वैरागडे यांनी तर आभार जीवन फुंडे अध्यक्ष किसान चौरास शेतकरी गट आसगाव यांनी मानले.

Previous articleसाकोलीत निघाला परभणी, बीड हत्याकांड तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेधार्थ जनआक्रोश निषेध मोर्चा
Next articleशेतक-यांच्या प्रश्नासाठी लोकविकास संघटनेचे आंदोलन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.