Home जालना माहोरा येथे श्री छत्रपती शिवाजी प्रा.व मा.आश्रम शाळांमध्ये आनंद नगरी उत्सव साजरा

माहोरा येथे श्री छत्रपती शिवाजी प्रा.व मा.आश्रम शाळांमध्ये आनंद नगरी उत्सव साजरा

231

आशाताई बच्छाव

1001092984.jpg

माहोरा येथे श्री छत्रपती शिवाजी प्रा.व मा.आश्रम शाळांमध्ये आनंद नगरी उत्सव साजरा
तालुका प्रतिनिधी जाफराबाद- मुरलीधर डहाके
दिनांक 28/12/2024
आज दि. 28 डिसेंबर, शनिवार रोजी श्री छत्रपती शिवाजी प्रा.व मा. आश्रम शाळा, माहोरा येथे आनंद नगरी चे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री संदीप सीनगारे सर यांनी या आनंद मेळ्याचे उदघाटन केले. या वेळी विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद देत या मेळ्या मध्ये आपली दुकाने लावली. या मध्ये विविध फळे, भजी, वडापाव, गुलाबजाम, भेळ, समोसा कचोरी, दुकानातील तयार माल चहा इ प्रकारची दुकाने थाटली होती. विद्यार्थ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात खरेदी करून या कार्यक्रमाची रंगत वाढवली. शिक्षक मंडळींनी देखील स्वतः खरेदी करून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला. या आनंद नगरी मध्ये जवळपास दहा हजार रुपयाची उलाढाल झाली. या निमित्ताने मुलांना बाजारातील व्यवहाराची माहिती, खरेदी- विक्री, नफा-तोटा,निर्मिती व विक्री कौशल्य इ. बाबींचा अनुभव घेता आला.
समारोपाच्या वेळेस मुख्याध्यापक तसेच इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बाजारातील व्यवहारा विषयी मार्गदर्शन केले. अतिशय आनंदात आणी उत्साहात हा कार्यक्रम पार पडला.