आशाताई बच्छाव
उद्या 21 डिसेंबरला भंडारा बंद व निषेध मोर्चाचे आयोजन
परभणी येथील हत्याकांडाच्या निषेधार्थ व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपमान जनक केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ
संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी )परभणी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोरील संविधान शिल्पाची काही माथेफिरू यांनी तोडफोड केली .त्यानंतर आंबेडकरी अनुयांकडून आंदोलन करण्यात आले. त्या शहरातील वातावरण तणाव पूर्ण होते. ही आंबेडकरी कार्यकर्त्यांची स्वाभाविक प्रतिक्रिया होती. काही समाजकंटकांनी हेतू परस्पर दंगल घडवून आणली .दुसऱ्या दिवशी पोलिसांनी कडून कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी समाजातील महिला, पुरुष आणि तरुणांना अक्षरशः चिरडून टाकण्यात आले. पोलिसांनी बाहेरील लोकांना सोबत घेऊन अमानुषपणेआंबेडकरी कार्यकर्त्यांना मारहाण केली .त्यात अनेक कार्यकर्ते गंभीर जखमी झाले. अटक सत्र राबवून निष्पाप कार्यकर्त्यांना जेलमध्ये कोंबले. परभणीच्या नालायक ठाणेदाराने बाहेरच्या लोकांची मदत घेत महिला व पुरुष यांच्यावर अत्याचार करीत असल्याचे दृश्य आपल्या मोबाईल मध्ये चित्रित करीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या ला कॉलेजचे शिक्षण घेत असलेल्या कार्यकर्त्याला सुद्धा अटक करून पोलीस स्टेशनमध्ये थर्ड डिग्री चार्जर करून फोन केला .त्याची शवविच्छेदन लोकांच्या दबावामुळे इन कॅमेरा करावे लागले .त्यात सोमनाथ चा प्रचंड महाराणी मुळे मृत्यू झाला हे सत्य बाहेर आले आहे. जेव्हा जेव्हा महायुतीचे सरकार येते तेव्हा तेव्हा कोणते कारण काढून आंबेडकरी जनतेवर अमान्य, सत्याचाराच्या घटना घडविल्या जातात. याचे मूळ जातिवादात असते. हे वारंवार समोर आलेले आहे. या घटनेच्या निषेधार्थ शनिवार दिनांक 21 डिसेंबर २०२४ ला भंडारा बंद तसा निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. निषेध मोर्चाची सुरुवात हुतात्मा स्मारक शास्त्री चौक भंडारा येथून दुपारी दोन वाजता करण्यात येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक जिल्हाधिकारी चौक भंडारा येथे भव्य सभेत रूपांतर होऊन मागण्यांचे निवेदन भंडारा जिल्हाधिकारी मार्फत शासनाला सादर करण्यात येईल. करिता भंडारा जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी अनुयायी ,विविध सामाजिक संघटना ,पक्ष संघटना ,कार्यकर्ते यांनी वरील निषेध मोर्चा व बंदच्या आयोजनात सहभागी होऊन बंद व निषेध मोर्चा यशस्वी करावे असे आवाहन अजय मेश्राम, आसित बागडे, विनय बनसोड ,विनीत देशपांडे, अजित बनसोड ,सुगत शेंडे, सुरज डोंगरे ,तथागत फुले ,सुरज भालाधरे ,शरद खोब्रागडे ,रूपचंद रामटेके ,श्रीकांत बनसोड ,प्रफुल शेंडे ,हंसराज वैद्य,सदानंद इलमे, गोपाल सेलोकर, भैय्याजी लांबट, चंद्रशेखर टेंभुर्णी डॉ बाळकृष्ण सारवे ,रोशन जांभुळकर, अजबराव चिचामे, अशोक उईके, अमृत बनसोड, ज्ञानचंद,जांभूळकर ,राजेश मडामे ,दिलीप वानखेडे, संजीव भांबोरे विजय भोवते ,शिवदास गजभिये यांनी एका लेखी पत्रकाद्वारे केलेली आहे.






