आशाताई बच्छाव
डी. वाय. एस. पी. तथा पोलीस ठाणे चंदंझिरा चे प्रभारी अधिकारी श्रीमती करिश्मा चौधरी यांचा गावठी हातभट्टीच्या अड्ड्यावर छापा 3,50,000 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 20/12/ 2024
डी. वाय. एस .पी. चौधरी यांनी दिनांक २०/१२-२०२४ रोजी 9:00 वाजेच्या सुमारास पोलीस ठाणे चंदनझिरा हद्दीतील सुंदर नगर भागात अवैधरित्या गुप्तपणे सुरू असलेल्या गावठी हातभट्टीच्या अड्ड्यावर छापा टाकून तब्बल 3000 लिटर सर्व व दोन हजार लिटर गावठी हातभट्टीची दारू एकूण 3,50,000 रुपयाचा मुद्देमाल त्यांचे पथकासह कारवाई करून सदरचा मुद्देमाल नष्ट करून पोलीस ठाणे चंदनझीरा येथे सपोनी सुशील चव्हाण यांचे फिर्यादीवरुन आरोपी राम तेजराव जाधव वय 23 वर्षे राहणार सुंदर नगर चंदनझीरा जालना याच्यावर गुन्हा दाखल असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार जारवाल हे करीत आहेत.
सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष्माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद कुलकर्णी यांची मार्गदर्शनाखाली डीवायएसपी करिष्मा चौधरी, सपोनी चव्हाण ,पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत देशमुख ,कृष्णा तंगे, रवी देशमुख, राजू पवार, नवनाथ पाटील यांचे पथकांनी केली आहे.






