Home बीड सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची उचलबांगडी

सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची उचलबांगडी

182

आशाताई बच्छाव

1001067917.jpg

सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची उचलबांगडी

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड दि.२० डिसेंबर २०२४ बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आणि खंडणी प्रकरणात संशयित आरोपी वाल्मीक कराड यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशी स्पष्ट घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या प्रकरणातील दोषींवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे नागपूर येथील सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या अल्पकालीन चर्चेत बोलत होते. त्यांनी मस्साजोग प्रकरणावरून कठोर भूमिका घेत सरकारचा कायदा व सुव्यवस्थेवर ठाम विश्वास असल्याचे अधोरेखित केले. जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली मस्साजोग प्रकरणी संबंधित तपासात झालेल्या त्रुटीवर नाराजी व्यक्त करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची तात्काळ बदली करण्याची घोषणा केली. तपासाच्या प्रक्रियेत योग्य तो बदल घडवून आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारची ठाम भूमिका सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, सरकारने दोषींविरुद्ध कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. मोक्का अंतर्गत कारवाईमुळे गुन्हेगारांवर कठोर शिक्षा होईल, असे फडणवीस म्हणाले. राज्य सरकारने अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम उघडण्याचा इशारा दिला आहे.