Home बीड बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता पुढच्या हप्त्याची प्रतीक्षा!

बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता पुढच्या हप्त्याची प्रतीक्षा!

99

आशाताई बच्छाव

1000994677.jpg

बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता पुढच्या हप्त्याची प्रतीक्षा!

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड दि:२७ नोव्हेंबर २०२४ महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली. जुलै २०२४ मध्ये अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली. या योजनेचे आतापर्यंत पाच हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. त्यामुळे आता पुढचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा पात्र महिलांना आहे. जुलै २०२४ पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात कार्यान्वित झाली. १५ ऑक्टोबरपर्यंत या योजनेसाठी अर्ज करण्याकरता मुदत देण्यात आली होती. या योजनेअंतर्गत आतापर्यंत २ कोटी ४० लाख महिला पात्र ठरल्या आहेत. तर २ लाख २० हजार महिलांच्या खात्यात आतापर्यंत पैसे जमा झाले आहेत. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा पहिला आणि दुसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील हप्ताही काही दिवसांच्या फरकाने महिलांच्या खात्यात जमा झाला. तसेच नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागणार असल्याचे स्पष्ट झाल्याने तत्कालीन महायुती सरकारने तत्काळ अधिसूचना काढून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित पैसे दिवाळीचा बोनस म्हणून देण्यात आले. त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यावर आतापर्यंत पाच हप्त्यांचे साडेसात हजार रुपये जमा झाले आहेत. निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात थेट आर्थिक लाभ देणाऱ्या योजनांचा निधी निवडणूक आयोगाने रोखला होता. त्यामुळे ही योजना आता बंद होणार अशी चर्चा विरोधकांनी सुरू केली. परंतु, निवडणुका झाल्यानंतर महिलांना पैसे देण्यात येणार असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले, त्यामुळे डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच येणार आहेत. कारण आमची नियत स्वच्छ आहे. कारण आम्ही देणाऱ्यातले आहोत, घेणाऱ्यातले नाही असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यामुळे आता निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता पात्र महिलांना डिसेंबरच्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. ही योजना सरकारसाठी गेम चेंजर ठरली. यंदा मतदानाच्या टक्केवारीतही वाढ झाली. तसेच महिला मतदारांनीही मोठ्या प्रमाणात मतदान केल्याने महायुतीला फायदा झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे केव्हा मिळणार असा प्रश्न बीड जिल्ह्यातील महिलावर्गाकडून विचारला जातोय. एवढंच नव्हे तर, पुन्हा सत्तेत आल्यास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे १५०० वरून २१०० रुपये करण्यात आले आहेत. आता नव्या हप्त्याचे पैसे मिळताना जुन्या योजनेप्रमाणे १५०० रुपये देणार की वाढीव रकमेप्रमाणे २१०० रुपये देणार हाही प्रश्न महिलांकडून विचारला जात आहे.

Previous articleनारी रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल मीराताई कदम यांचा सत्कार
Next articleसापळी येथे मा. सरपंच महादेव सावके. व खाडे साहेब यांच्या उपस्थितीत. ग्रामपंचायत पाणी फिल्टर चे ओपनिंग करण्यात आले..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.