Home बीड परळीत वैद्यनाथ मंदिर परिसरातील फाटकाचा विषय न.प. मुख्याधिकाऱ्याकडून दुर्लक्षित – अँड.मनोज संकाये

परळीत वैद्यनाथ मंदिर परिसरातील फाटकाचा विषय न.प. मुख्याधिकाऱ्याकडून दुर्लक्षित – अँड.मनोज संकाये

135

आशाताई बच्छाव

1000992146.jpg

परळीत वैद्यनाथ मंदिर परिसरातील फाटकाचा विषय न.प. मुख्याधिकाऱ्याकडून दुर्लक्षित – अँड.मनोज संकाये

वारंवार निवेदने देऊनही लोकहिताची मागणी मान्य होईना!

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/परळी दि:२६ नोव्हेंबर २०२४ परळी शहरातील प्रभू वैद्यनाथ मंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग म्हणून परळीची ओळख आहे. याच परळीमध्ये मुख्याधिकाऱ्याचा मनमानी कारभार सुरू आहे. वारंवार निवेदने देऊन सुद्धा मंदिर परिसरातील फाटक बसवण्याची हिंमत मुख्याधिकारी साहेब दाखवतील का असा प्रश्न सामान्य परळीकरांना भेडसावत आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही लोकहिताच्या मागणीकडे दुर्लक्ष मुख्याधिकारी करत आहेत असा आरोप सामाजिक कार्यकर्ते अँड. मनोज संकाये यांनी केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर लागण्यापूर्वी या विषयासंदर्भात निवेदने मित्र मंडळाच्या वतीने असंख्य युवकांच्या साक्षीने देण्यात आली. जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा निवेदने दिली आहेत तरीसुद्धा नगरपालिकेचे मुख्याधिकारी साहेब याकडे साप दुर्लक्ष करत आहेत. मंदिर परिसरातील दक्षिणमुखी गणपती मंदिर आणि नगरपालिके समोर या संदर्भात पाच फुटाचे खड्डे खंदले आहेत मात्र लोखंडी फाटक बसविण्याची कार्यवाही होताना दिसत नाही. या खड्ड्यांमध्ये लहान मुले आणि आबाल वृद्ध नागरिक पाडण्याची भीती आहे. परळीकरांमध्ये सुद्धा याबाबत सकारात्मक प्रतिसाद आहे. लोकहिताचे कामे करण्यासाठी लोक नगरपालिकेतील प्रतिनिधींना निवडून देतात मात्र एकही प्रतिनिधी या बाबतीमध्ये बोलण्यास तयार नाही याचा अर्थ त्यांना लोकहिताचे काही देणे घेणे नाही का असा प्रश्न सामान्य परळीकरांच्या मनामध्ये आहे. या रस्त्यावरून मोठी वाहतूक आहे जड वाहनांची वाहतूक यामुळे येथे कोंडी होते. या रोड वरून जीव मुठीत धरून नागरिकांना जावे लागते त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी लोखंडी फाटक बसवणे अत्यंत गरजेचे आहे या लोकहिताच्या मागणीचा गांभीर्यपूर्वक मुख्याधिकारी साहेबांनी विचार करावा आणि त्वरित कारवाई करून फाटक बसवण्याचे काम त्वरित सुरू करावे अन्यथा नगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

Previous articleरवी राणाच्या प्रचार सभेत फडणवीसांचे ते शब्द खरे ठरले.महाविकास आघाडी भुई सपाट करण्याची स्वप्नपूर्ती.
Next articleनारी रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल मीराताई कदम यांचा सत्कार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.