Home भंडारा जिल्हा व तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या निवास स्थानासमोर जनआंदोलन करणार — नरेंद्र...

जिल्हा व तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या निवास स्थानासमोर जनआंदोलन करणार — नरेंद्र पहाडे यांचा इशारा

136

आशाताई बच्छाव

1000774567.jpg

जिल्हा व तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या निवास स्थानासमोर जनआंदोलन करणार — नरेंद्र पहाडे यांचा इशारा

पवनी तालुक्यातील मांगली चौरास येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉ.नसल्याचे प्रकरण

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)जिल्हा व तालुका प्रशासनाच्या संबधित यंत्रणेने वेळीच दखल घेऊन पवनी तालुक्यातील
मांगली चौरास येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात डॉ .ची तूर्त व्यवस्था करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भंडारा विधानसभा प्रमुख नरेंद्र पहाडे यांनी केली आहे.
मांगली चौरास परिसरातील शेतकरी पर्यायी व्यवसाय म्हणून पाळीव दुधाळ जनावरांचे पालन पोषण करून दुग्ध व्यवसाय करतात .पाळीव जनावरांचे चांगल्या प्रकारे संगोपन करता यावे यासाठी शासन प्रशासनाच्या पशुवैद्यकीय विभागाने ग्रामीण भागात पशुवैद्यकीय रुग्णालय स्थापन केले असून या रुग्णालयात कार्यरत
पशुवैद्यकीय अधिकारी हे पाळीव जनावरांना आजार झाल्यास तपासणी करून योग्य उपचार करीत असतात .परंतु पवनी तालुक्यातील मांगली चौरास येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे
उपचारा अभावी जनावरे दगावत आहेत तसेच गोपलकांना जनावरांचा उपचार करण्यासाठी खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टरकडे जावे लागत असून यामुळे शेतकरी गोपलकांना कमालीचा शारीरिक, मानसिक ,भावनिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याची दस्तुरखुद
शेतकरी , गोपालकांची मोठी ओरड आहे.यावरून शेतकरी गोपालक त्रस्त व पशुवैद्यकीय विभाग सुस्त असे चित्र सकृत पणे दिसून येत आहे.
मांगली चौरास येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध न करणे ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब असून याबाबत शेतकरी तसेच गोपलकांमध्ये तीव्र नाराजी व असंतोष पसरला असून भविष्यात या असंतोषाचा तीव्र भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याप्रकरणी जिल्हा व तालुका प्रशासनाच्या पशुवैद्यकीय विभागाच्या अधीनस्त सबंधित यंत्रणेने वेळीच दखल घेऊन तथा मानवीय दृष्टीकोनातून गांभीर्य पूर्वक सम्यक विचार विनिमय करून एक विशेष बाब म्हणून पवनी तालुक्यातील मांगली चौरास येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुवैद्यकीय डॉक्टर ची तूर्त व्यवस्था करण्याची तसदी घ्यावी मात्र याकडे हेतूपूरस्पर अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले तर या विरोधात रस्त्यावर उतरून शिवसेना स्टाईलने जिल्हा व तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या निवास स्थानासमोर शेतकरी आणि गोपालकां समवेत तीव्र जनआंदोलन करण्यात येईल व याबाबतची संपूर्ण जबाबदारी जिल्हा व तालुका पशुवैद्यकीय विभागाची राहील असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भंडारा विधानसभा प्रमुख नरेंद्र पहाडे यांनी दिला आहे.