Home भंडारा पहेला ते अंभोरा रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डेच खड्डे

पहेला ते अंभोरा रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डेच खड्डे

238

आशाताई बच्छाव

1000774585.jpg

पहेला ते अंभोरा रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डेच खड्डे

अपघातास निमंत्रण

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी )भंडारा तालुक्यातील पहेला ते अंभोरा रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यावर पाणी साचलेले आहे .त्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे या रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित जनप्रतिनिधी यांनी या रस्त्याकडे तात्काळ लक्ष देऊन रस्ता सुरळीत करण्यात यावा. कारण पहेला ते अंभोऱ्याकडे जो रस्ता जातो तो रस्ता भंडारा व नागपूर जिल्ह्याला जोडणारा असून वैनगंगा नदीवर मोठा पुदिया बांधलेला आहे . हा पुलिया बघण्याकरता दोन्ही जिल्ह्यातील पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात. भंडारा जिल्ह्यातील पर्यटक पहेला कडून अंभोरा कडे जातात तेव्हा त्यांना मोठमोठे खड्डे पडलेले दिसत असून खड्ड्यात पाणी साचलेले आहे. हे खड्डे अपघातास निमंत्रित असून हा मोठे मोठे पडलेला खड्ड्यांबाबत पर्यटकांची ओरड असून हा रस्ता पर्यटकांच्या दृष्टिकोनातून व सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टिकोनातून सुरळीत करण्यात यावा अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे.