आशाताई बच्छाव
ग्रामविकास मंडळ ऐनारी मुंबई मंडळाची नवीन कार्यकारिणीची निवड
मुंबई,(विजय पवार कार्यकारी संपादक)- उपरोक्त मंडळाची सर्वसाधारण सभा रविवारी दिनांक ११ ऑगस्ट २०२४ रोजी संध्याकाळी साडेचार वाजता मंडळाचे अध्यक्ष श्री. सुरेश साहिल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. या सभेला नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तसेच मागील सभेचे वाचन करून मंजुरी देण्यात आली. नवीन कार्यकारणीत खालील सदस्यांची निवड करण्यात आली.
अध्यक्ष- श्री. राजेंद्र सुर्वे, उपाध्यक्षपदी- श्री. बिपीन सुर्वे व श्री. सुखदेव पवार, सचिव- श्री. जगदीश चाळके, उपसचिव- श्री. तानाजी साईल व श्री. धर्मवीर मोहिते,
खजिनदार- श्री. गोपाळ साईल, सह खजिनदार- श्री. जयराम जोंधळे, व श्री. संदीप साईल. यांची निवड करण्यात आली
तसेच मंडळाच्या कार्यकारणी मध्ये नवीन सदस्यांची निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.






