आशाताई बच्छाव
बागलाण तालुक्याला तिसरा पर्याय म्हणून मीच सक्षम आनंदा मोरे
नामपूर प्रतिनिधी वामन शिंदे
बागलात विधानसभा मतदार संघ आदिवासी प्रवर्गासाठी राखीव असून गेल्या 40 वर्षापासून या मतदारसंघात बोरसे व चव्हाण कुटुंबानेच आलटून पालटून सत्ता मिळवली आहे जनतेच्या मनात आता तिसरा पर्याय दिसत असून याबाबत संपूर्ण मतदारसंघाचा दौरा केल्यानंतर मला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याची माहिती ज्येष्ठ आदिवासी नेते आनंदा मोरे यांनी दिली आहे
आनंदा मोरे हे मूळचे महड बहीराणे गावचे असून उत्तम शेतकरी आहेत चाळीस वर्षापासून तालुक्याच्या सामाजिक राजकीय वर्तुळात सक्रिय आहेत त्यांनी अनेक वर्ष गावचे सरपंच पद भोगले आहे यानंतर शासनाच्या विविध शासकीय समित्यांवर काम उत्तम काम केले आहे मागील पंचवार्षिक ला बाजार समितीच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत आदिवासी गटातून ते प्रचंड मतांनी विजयी झाले होते बाजार समितीत शेतकऱ्याच्या हितासाठी ते नेहमी झटले जिद्द व चिकाटी आत्मविश्वासाच्या जोरावर आजपर्यंत अनेक सामाजिक लोक उपयोगी समस्या त्यांनी सोडवल्या आहेत प्रशासनाचा त्यांना अतिशय दांडगा अनुभव असून पंचायत समिती जिल्हा परिषद विधान सभा मंत्रालय या ठिकाणी सातत्याने जाऊन जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे आदिवासी ना जातीचे दाखले वन जमिनी रेशन कार्ड मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक शिबिरे घेतली आहेत विधानसभेचे बिगुल वाढल्यामुळे बागलाण तालुक्यातील 170 गावागावात वाड्यावर भेट देऊन त्यांनी मतदारांचा कौल जाणून घेतला यामध्ये विद्यमान आमदार बोरसे यांनी आजपर्यंत आदिवासींच्या जीवावर मतदान मिळवले मात्र आदिवासी बांधवांसाठी काहीच केले नसल्याचा रोष आदिवासी बांधव व्यक्त करत आहे एकंदरीत या निवडणुकीत जनतेच्या मनात दोन्ही आजी-माजी आमदारांबाबत मात्र आदिवासी बांधवांसाठी काहीच केले नसल्याचा रोष आदिवासी बांधव व्यक्त करत आहे एकंदरीत या निवडणुकीत जनतेच्या मनात दोन्ही आजी-माजी आमदारांबाबत नाराजीचा सूर दिसत असून तिसरा पर्याय मतदार शोधत आहे मोरे यांनी भाजपाकडे उमेदवारी मागितले आहे अत्यंत शांत स्वभाव हजर जबाबी पणा मनमिळावू स्वभाव विकासाचा ध्यास बहुजन समाजा सोबत असलेले सबंध पाहता जर त्यांना पक्षाने उमेदवारी दिली तर नक्कीच ते मोठे मताधिक्य मिळवतील मात्र पक्षाने उमेदवारी न दिल्यास शेतकरी संघटना किंवा तिसरी आघाडी किवां अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्धार त्यांनी स्थानिक पत्रकाराशी वार्तालाप करताना व्यक्त केला आहे






