Home बुलढाणा अखेर संतोष मेढेंच्या आंदोलनाला यश ! – तहसीलदार पिलारे यांची बदली..

अखेर संतोष मेढेंच्या आंदोलनाला यश ! – तहसीलदार पिलारे यांची बदली..

91

आशाताई बच्छाव

1000610251.jpg

अखेर संतोष मेढेंच्या आंदोलनाला यश ! – तहसीलदार पिलारे यांची बदली..
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
मोताळा :- बुलढाणा याबाबत सविस्तर वृत्त असे की तहसीलदार वैभव पिलारे यांच्या हुकुमशाही कार्यपद्धतीच्या विरोधात मोताळा तालुक्यातील
सर्वपक्षीय नेते मंडळी एकत्रित येत दि.१ फेब्रुवारी २०२४ रोजी तहसीलच्या आवारात बैठा सत्याग्रह केला होता परंतु तहसीलदार पिलारे यांच्या कार्यपद्धतीत कोणताही बदल झालेला नव्हता त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संतोष मेढे यांनी ४ मार्च ते ८ मार्च असा चार दिवसीय आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला होता मात्र तेव्हा लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर तहसीलदार बदलीचे आदेश रद्द करण्यात आले होते आता उपोषणाच्या चार महिन्यानंतर तहसीलदार पिलारे यांची बदली झालेली असून सामाजिक कार्यकर्ते संतोष मेढे आणी त्यांच्या सोबत असलेले सर्वपक्षीय नेते मंडळींच्या आंदोलनाला यश प्राप्त झाले आहे.

Previous articleब्रेकिंग! ‘दया कुछ तो गडबड है!’ -आरोग्य सेविका पद भरतीत घोटाळा?
Next articleदुचाकीस्वारास धडक देवून पळ काढणार्‍या वाहनचालकास पाठलाग करून पकडले
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.