Home बुलढाणा ब्रेकिंग! ‘दया कुछ तो गडबड है!’ -आरोग्य सेविका पद भरतीत घोटाळा?

ब्रेकिंग! ‘दया कुछ तो गडबड है!’ -आरोग्य सेविका पद भरतीत घोटाळा?

93

आशाताई बच्छाव

1000610241.jpg

ब्रेकिंग! ‘दया कुछ तो गडबड है!’ -आरोग्य सेविका पद भरतीत घोटाळा?
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :-परीक्षा कोणतीही असो! ती खरच पारदर्शीपणे राबवली जाते का? अलीकडे तर परीक्षांमध्ये अनेक घोटाळे उघडकीस येत आहेत. त्यापैकीआरोग्य सेविका पद भरतीत कागद पडताळणी व नियुक्ती बाबत संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत ए एन एम सहाय्यकारी प्रसविका शैक्षणिक पात्रता असणाऱ्या महिला उमेदवारांनी शंका उपस्थित केली आहे.
राज्यात जिल्हा परिषद अंतर्गत विविध पद भरती प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये आयबीपीएस कंपनीने
सीबीटी ऑनलाइन संगणक प्रणाली द्वारेपरीक्षा घेतली असून निकाल जाहीर केले आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया जिल्हा निवडसमितीमार्फत सुरू असून आरोग्य सेविका या पदाकरिता शासन नियम व सध्या होत असलेली कागदपत्रे पडताळणी यामध्ये विरोधाभास व विसंगती दिसून येत आहे. असा आरोप होत आहे.
सदर पदाबाबतची शासन नियमानुसार शैक्षणिक पात्रता असणाऱ्या ए एन एम सहाय्यकारी प्रसविकाशैक्षणिक गुणवत्ता प्राप्त महिलांवर अन्याय होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
सदर आरोग्य सेविका पदाकरिताशासन नियमानुसार
ए एन एम पात्रता असताना त्याच ठिकाणी जी एन एम व बीएससी नर्सिंगमहिला उमेदवारांची कागद पडताळणीहोत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद मुख्य अधिकारी यांनी जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत एएनएम पदासाठी जीएन एम व बीएससी नर्सिंग महिला उमेदवारांची कागदपत्र पडताळणी होत आहे का? सदर शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत का? किंवा दिल्या जाणार आहेत का? त्याचा खुलासा करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याप्रकरणी जाब विचारण्यासाठी जिल्हा परिषदेवर धडक सुद्धा दिली जाणार असल्याची माहिती आहे.

Previous articleपिंप्रीगवळी ते टाकळी घडेकर रस्त्याने होत आहे विद्यार्थ्यांसह नागरिकांचे प्रचंड हाल—
Next articleअखेर संतोष मेढेंच्या आंदोलनाला यश ! – तहसीलदार पिलारे यांची बदली..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.