आशाताई बच्छाव
दुचाकीस्वारास धडक देवून पळ काढणार्या वाहनचालकास पाठलाग करून पकडले
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- भरधाव वेगाने वाहन चालवून दुचाकीस्वारास धडक देत त्याच्या मृत्युस कारणीभूत ठरणार्या पिकअप वाहनाचालकाचा चाळीसगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या मित्राने पाठलाग करून पकडले.
2 रोजी रात्री 11.15 वाजेच्या सुमारास एक पिकअप वाहन चालक भरधाव वेगाने वाहन चालवत मालेगाव कडून चाळीसगाव कडे येत असताना चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर टाकळी जवळ हॉटेल चंद्रा जवळ दुचाकीस्वारास जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु झाला.अपघातानंतर पिकअप चालकाने चालकाने चाळीसगावकडे पळ काढला. अपघाताचा आवाज येताच हॉटेलच मालक राहुल पवार यांच्यासह सहकार्यांनी व जेवणासाठी आलेल्या ग्राहकांनी अपघातस्थळी धाव घेतली.
जवळच हॉटेल मध्ये जेवणाची वाट पाहत असलेले चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचे मित्र प्रितेश कटारिया हेही अपघाताच्या आवाजाने धावले. दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु झाल्याने पळ काढलेल्या पिकअप चालकास पोलीस निरीक्षक संदीप पाटील व प्रितेश कटारिया यांनी खाजगी वाहनातून पाठलाग करून बेलगंगा साखर कारखान्याजवळ अपघात ओव्हरटेक करून पिकअप चालकास ताब्यात घेतले
त्याने रिहान उर्फ अब्बू अली सय्यद अली रा नागरदेवळा, त पाचोरा असे नाव असल्याचे सांगितले.अपघातानंतर लोक मारतील या भीतीने अपघात स्थळावरून पळ काढल्याची कबुली दिली. या पिकअप चालकासम मेहूणबारे पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी राहुल पवार यांचे फिर्यादीवरून मेहुणबारे पोलीस स्टेशनला पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






