Home वाशिम जडीबुटी दिनानिमित्त नित्य योग वर्ग पतंजली व योग सहयोग कडून जुनी आयुडीपी...

जडीबुटी दिनानिमित्त नित्य योग वर्ग पतंजली व योग सहयोग कडून जुनी आयुडीपी परिसरात वृक्षारोपण

136

आशाताई बच्छाव

1000610274.jpg

जडीबुटी दिनानिमित्त नित्य योग वर्ग पतंजली व योग सहयोग कडून जुनी आयुडीपी परिसरात वृक्षारोपण
वाशिम,( गोपाल तिवारी ब्युरो चीफ)- आंतरराष्ट्रीय जडीबुटी दिनाचे औचित्य साधून रविवार, ४ ऑगष्ट रोजी नित्य योग वर्ग पतंजली व योग सहयोगच्या वतीने स्थानिक जुनी आयुडीपी कॉलनीमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला योग पतंजलीच्या राज्य प्रभारी सौ. दीपाताई वानखडे, किसान सेवा समिती जिल्हा प्रभारी शंकर उजळे, सहयोग फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. संगीता इंगोले यांच्यासह नित्यसाधक बहूसंख्येने उपस्थित होते. यावेळी वड, पिंपळ, कडूलिंब, डाळींब, कडीपत्ता, अ‍ॅलोवेरा, चाफा, आंबा अशा विविध प्रकारच्या वृक्षांची रोपे लावण्यात आली. त्यानंतर योग प्रशिक्षक सौ. दीपाताई वानखडे यांनी विविध योग अभ्यास, जडीबुटी दिन आणि वृक्षारोपणाचे महत्व उपस्थितांना सांगीतले. नेहमीच्या वापरातल्या तुळस, अडुळसा यांचे महत्त्व विशद केले आणि नियमित योग करण्याचे आवाहन केले. आपल्या परसबागेत कोरफड, अडुळसा, ब्राह्मी, तुळस, पारीजात अशी झाडे लावा असे सांगितले. लहानपणापासूनच मुलांना वनस्पतींचे महत्त्व समजले तर अधिक चांगले. त्याचबरोबर जुन्या आयुडीपीत सुरु असलेल्या नित्य योग वर्गाचा पुरुष व महिलांनी लाभ घेवून आपले आरोग्य अबाधीत ठेण्याचे आवाहन सौ. वानखडे यांनी केले. सौ. संगीता इंगोले यांनी जडीबुटीदिनाचे महत्व सांगतांना औषधी वनस्पतींची माहिती दिली. जडी आणि बुटी यांचा संबंध स्पष्ट करताना आपल्या जीवनातील त्यांचे महत्व विशद केले. तसेच प्रत्येकाने आपल्या तसेच आपल्या प्रियजनांच्या वाढदिवशी एक तरी वृक्ष लावून त्याची काळजी घ्यावी असे आवाहन सौ. इंगोले यांनी शेवटी केले. शेवटी माझी वसुंधरा ही प्रतिज्ञा घेवून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Previous articleदुचाकीस्वारास धडक देवून पळ काढणार्‍या वाहनचालकास पाठलाग करून पकडले
Next articleसमाजकारणातून राजकारणात प्रवेश घेण्याची इच्छा.( राजेंद्र चौरे)
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.