आशाताई बच्छाव
खामगावात एसडीपीओ पथकाने एका टोळीचा केला पर्दाफाश,चोरीच्या ११ दुचाकी जप्त…
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
बुलढाणा :- बुलढाणा जिल्ह्यात मोटर सायकल चोरीचे प्रमाण वाढले असून खामगाव मध्ये अकरा मोटरसायकली जप तक केल्या आहेत एसडीपीओ पथकाने एका टोळीचा पर्दाफाश करत वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरीच्या ११ दुचाकी जप्त केल्या आहेत.
मागील दोन तीन वर्षांपासून खामगावसह संपूर्ण जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. दुचाकी चोऱ्या करणाऱ्या अनेक टोळ्या जिल्ह्यात सक्रिय असून सातत्याने दुचाक्या चोरी जात आहेत. जवळपास दर दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात दुचाकी चोरीची घटना उघडकीस येत आहे. दुचाकी चोरांना रोखणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान
बनलेले आहे. दरम्यान, एसडीपीओ पथकाने शेगाव, आकोट, अकोला,नागपूर व खामगाव तालुक्यातील कंझारा या ठिकाणावरून चोरीच्या गुन्ह्यातील एकूण ११ दुचाकी जप्त केल्या आहेत. पोलिसांनी याप्रकरणी महेंद्र उर्फ मोनू नेमीचंद शर्मा रा. गांधी चौक शेगाव, आशुतोष सुरेश भुयारकर रा. व्यंकटेश नगर शेगाव, सुजल निरंजन शर्मा रा. निर्मल नगर शेगाव व दोन अल्पवयीन चोरटे अशा पाच जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातून ९ दुचाकी जप्त केल्या. तर खामगाव तालुक्यातील कंझारा येथून शेख इमरान शेख मुबारक याच्या ताब्यातून दोन दुचाक्या जप्त केल्या आहेत. या चोरट्यांकडून आणखी चोरीच्या घटनांचा छडा लागण्याची शक्यता आहे. ही कारवाई एसडीपीओ विनोद ठाकरे पथकातील पोलिस उपनिरीक्षक मनोज वासाडे, पो.कॉ. सुधाकर थोरात, रवींद्र कन्नर, विशाल कोळी, सुनील देव यांनी केली आहे






