Home नाशिक नाशिक जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात एकदाच पाऊस; पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

नाशिक जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात एकदाच पाऊस; पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

40
0

आशाताई बच्छाव

1000526872.jpg

नाशिक जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात एकदाच पाऊस; पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
सतीश सावंत-विभागीय प्रतिनिधी क. स. मा. दे.

राज्यातील अनेक भागांत पावसाने जोर धरला असून, १० जुलैपर्यंत मराठवाडा वगळता बहुतेक भागांत पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला होता. यानुसार राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. मात्र, अद्यापही काही भागात शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणात केवळ २२ टक्के पाणीसाठी शिल्लक असून, पाणीकपातीचे संकट टाळण्यासाठी नाशिककरांना अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
ज्या भागात पुरेसा पाऊस झाला आहे. त्या भागात शेतकऱ्यांनी पेरणीला आणि शेतीच्या कामांना सुरुवात केली आहे. दरम्यान, आज राज्यासह नाशिक जिल्ह्यातील हवामान कसं असेल, याबाबत हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे. जाणून घेऊयात काय आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज कोठे पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

या’ भागांत यलो अलर्ट

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस होऊ शकतो. तर, बहुतांश भागात हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या भागात मुसळधार पावसाची शक्यता असून, हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
नाशिक जिल्ह्यात पेठ, सुरगाणा, कळवण, सटाणा, देवळा या तालुक्यात डांगी पावसाचा जोर असून, या पावसाचा जोर आता कमी होणार आहे. मात्र, तरीही इतर प्रणाल्यांतून या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, नाशिक जिल्ह्यातील दक्षिण भागात सिन्नर, दिंडोरी, निफाड, येवला, नांदगाव, चांदवड या तालुक्यांमध्ये पुढील काही दिवस मध्यम ते जोरदार पावसाची दाट शक्यता आहे.

मालेगाव तालुक्यात केवळ एकदाच पाऊस; शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा

तर, दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर पुन्हा पावसाचे संकट उभे ठाकले असून, येथील शेती पिके संकटात सापडली आहेत. मागील महिनाभरापासून मालेगाव तालुक्यात दमदार पाऊस केवळ एकदाच झाला असून, त्याच पावसाच्या आशेवर शेतकऱ्यांनी पेरण्याही केल्या आहेत. मात्र, त्यानंतर पावसाने शेतकऱ्यांना हुलकावणी दिल्याने येथील शेतकऱ्यांच्या नजरा अद्यापही आभाळाकडे लागून आहेत.

पावसाविना पिके करपू लागल्याने जेमतेम पाण्यावर पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ऐन पावसाच्या महिन्यांतही शेतकऱ्यांसमोर पाण्याचे संकट असून विहिर, बोअरवेल, शेततळे या साठवणुकीतील पाण्यातून पीकांसाठी पाणी उपलब्ध केले जात आहे. तर, येणाऱ्या काळात जोरदार पावसाची मालेगावसह इतरही भागातील नागरिकांना प्रतीक्षा असून, नाशिक शहरातील धरणांनीही तळ गाठला असून, धरण क्षेत्रातही जोरदार पाऊसाची गरज आहे.

Previous articleआमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त विध्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप
Next articleखामगावात एसडीपीओ पथकाने एका टोळीचा केला पर्दाफाश,चोरीच्या ११ दुचाकी जप्त…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here