Home अमरावती अमरावती मध्यवर्ती कारागृहात फटाका, की बॉम्ब? उडाली खळबळ.

अमरावती मध्यवर्ती कारागृहात फटाका, की बॉम्ब? उडाली खळबळ.

40
0

आशाताई बच्छाव

1000526884.jpg

अमरावती मध्यवर्ती कारागृहात फटाका, की बॉम्ब? उडाली खळबळ.
दैनिक युवा मराठा.
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक
अमरावती.
अमरावती येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये दोन बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने मोठी खळबळ मिळाली आहे. एक बॉम्ब सदृश्य चेंडूचा स्फोट झाल्याची माहिती असून पोलीस कारागृह प्रशासक ना कडून दुजोरा मिळू शकला नाही. कारागृहाच्या मागील बाजूने प्लास्टिक बॉल मधून दोन फटाके आत फेकण्यात आले. ते दोन डायरेक्ट च्या मधून मध येऊन पडल्याची माहिती उशिरा रात्री समोर आली आहे. ते दोन्ही प्लास्टिक बॉल मध्ये असलेले फटाके, सुतळी बॉम्ब सदृश असल्याची माहिती देखील चंद्रशेखर रेड्डी यांनी दिली आहे. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. कारागृह प्रशासनाकडून ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, उपायुक्त सागर पाटील, उपयुक्त गणेश शिंदे, उपयुक्त कल्पना बारवकर, एसीपी शिवाजी बचाटे पुणे शाखा पथक व फैजलपुरा पोलीस जिल्हा कारागृहात दाखल झाले आहेत. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी हे कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांच्याशी चर्चा करत असून कारागृहाच्या आत नेमके काय घडले याबाबत बाहेर माहिती आलेली नाही. मात्र कारागृह बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आल्याने काहीतरी मोठी घटना घडली असल्याचे सूत्रांनी सांगितले. शहर पोलीस आयुक्तालयातील बामशोधक व नाशक बदकाला देखील पाचरण करण्यात आले असून श्रावण पथक देखील तेथे पोहोचले आहे. यापूर्वी ज्याप्रमाणे चेंडूमध्ये गांजा आढळला होता. अगदी त्याचप्रमाणे प्लास्टिक चेंडूच्या आकाराची बॉम्ब सदृश्य वस्तू जिल्हा कारागृहात आढळून आलेची माहिती आहे. दरम्यान कारागृहामध्ये प्लास्टिकच्या चेंडूमध्ये दोन फटाके सदृश्य वस्तू फेकण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी दिली पैकी एक फटाका फुटले ची माहिती देखील त्यांनी उशिरा रात्री दिली. बाम शोधा व नाशक पथकाने त्यात दोन प्लास्टिकच्या चेंडू मध्ये फटाके असल्याचा स्पष्ट केले आहे. उशिरा रात्रीपर्यंत कारागृहातील अंतर्गत तपास सुरू होती. कारागृहाच्या मागील बाजूने प्लास्टिक बॉल मधून दोन फटाके आप फेकण्यात आले. ते दोन बॅरेजच्या मधोमध येऊन पडल्याची माहिती उशिरा रात्री समोर आली आहे. ते दोन्ही प्लास्टिक बॉल मध्ये असलेले फटाके, सुतळी बॉम्ब सदृश्य असल्याची माहिती देखील रेड्डी यांनी दिली आहे.

Previous articleखामगावात एसडीपीओ पथकाने एका टोळीचा केला पर्दाफाश,चोरीच्या ११ दुचाकी जप्त…
Next articleलोककलावंत श्रीकांत नागदेवे साकोली विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here