Home भंडारा लोककलावंत श्रीकांत नागदेवे साकोली विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक

लोककलावंत श्रीकांत नागदेवे साकोली विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक

27
0

आशाताई बच्छाव

1000526892.jpg

लोककलावंत श्रीकांत नागदेवे साकोली विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )वंचित बहुजन आघाडीची भुमिका निर्णायक ठरणार. निवडणूक आयोगाने काही राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केलेली आहे. निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची तारीखही जाहीर करण्यात येईल. २८८ सदस्यसंख्या असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत सदयस्थितीत शिवसेना (शिंदे गट ) , राष्ट्रवादी (अजित पवार गट) व भाजप इ.मिळून महायुतीचे सरकार सत्तास्थानी आहे.
साकोली विधानसभा मतदारसंघ – ६२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. साकोली मतदारसंघात भंडारा जिल्ह्यातील साकोली, लाखनी आणि लाखांदूर या तालुक्यांचा समावेश होतो. साकोली विधानसभा हा भंडारा-गोंदीया लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. या विधानसभा क्षेत्रात अनुसुचीत जाती व जमातीच्या मतदारांचे प्राबल्य आहे. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे काशीवर राजेश लहानू विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसच्या सेवकभाऊ वाघयेंचा पराभव केला होता. त्यानंतर सन २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नानाभाऊ पटोले यांनी भाजप उमेदवार डॉ.परीणय फुके यांचा पराभव केला होता. अलीकडे आता २०२४ ची निवडणूक रंगतदार होणार आहे. पक्षश्रेष्ठींतर्फे कोणाला तिकीट मिळेल यांवर भविष्यातील गणीत ठरणार आहे.
सदयस्थितीत ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवीत आहेत. राज्यात वंचितची हवा छान आहे. जातीपातीचे गणीत विसरून राज्याच्या विकासासाठी बहुतांश मतदारांचा कल वंचितकडे वळलेला आहे. वंचितने तळागाळातील वंचित समुहाला राजकीय प्रतिनिधित्व मिळावे म्हणून उमेदवारी दिली आहे. साकोली विधानसभा मतदारसंघात वंचीत बहुजन आघाडी निर्णायक भुमीका घेणार आहे असा विश्वास वंचितचे लाखनी तालुकाध्यक्ष श्रीकांत नागदेवे यांनी व्यक्त केला आहे.
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी परवानगी दिल्यास वंचितच्या वतीने आपण स्वताः साकोली विधानसभा लढवू अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
लाखनी तालूक्यातील सोमलवाडा या छोटयाशा खेडेगावातील मूळचे रहीवाशी असलेले श्रीकांत नागदेवे हे पदवीधर असून एक प्रसिद्ध समाजप्रबोधनकार आहेत. प्रसिद्ध लोकशाहीर अंबादासजी नागदेवे यांचे ते वारसदार आहेत. तमाशाच्या माध्यमातून लाखनी , साकोली व लाखांदूर तालुक्यातील बहुतांश गावे त्यांनी पिंजून काढलेली आहेत. त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. आपल्या सेवाभावी स्वभावातून त्यांनी जनमाणसांत आपली छाप सोडलेली आहे. अमर कलानिकेतन संघाचे ते संस्थापकीय अध्यक्ष आहेत. त्यांचा संघ खेडयापाडयात जावून लोकांचे प्रबोधन करीत असतो. त्यांनी शाहीरी कलेचा वारसा जपत अनेक जनहिताची कामे केली आहेत. सध्या ते लाखनी तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आहेत. भेल प्रकल्पाचा मुद्दा , घरकुल लाभार्थ्यांना कायदेशीर मदत करणे , निराधारांना अर्थसहाय्य करणे , विवाहसोहळे आयोजीत करणे इ. अनेक सत्कार्ये त्यांनी साकोली मतदारसंघात केली आहेत.
सदयस्थितीत साकोली मतदारसंघात बेरोजगारी हा सर्वात मोठा विषय आहे. काँग्रेस व भाजपनेही सत्तेत असताना बेरोजगारीचा प्रश्न न मिटविल्यामुळे मतदारसंघातील जनता राजकारण्यांविषयी उदासीन आहे. त्यामुळे तिसरा पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडी ही साकोली विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. असा ठाम विश्वास श्रीकांत नागदेवे यांनी व्यक्त केला आहे.

Previous articleअमरावती मध्यवर्ती कारागृहात फटाका, की बॉम्ब? उडाली खळबळ.
Next articleवृत्तपत्र विक्रेते आयु. अशोक बागडे यांचे वाचन संस्कृती समृध्द करण्यात महत्वपुर्ण योगदान. – प्रा.श्रीकृष्ण बनसोड.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here