Home वाशिम आज वाशिममध्ये बहूजन मातंग मेळावा व गुणवंत गौरव सोहळा कृषी उत्पन्न बाजार...

आज वाशिममध्ये बहूजन मातंग मेळावा व गुणवंत गौरव सोहळा कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजन खासदार संजय देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन उपस्थित राहण्याचे अ.भा. मातंग संघाचे आवाहन

136

आशाताई बच्छाव

1000525584.jpg

आज वाशिममध्ये बहूजन मातंग मेळावा व गुणवंत गौरव सोहळा
कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजन
खासदार संजय देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन
उपस्थित राहण्याचे अ.भा. मातंग संघाचे आवाहन
वाशिम,( गोपाल तिवारी ब्युरो चीफ)- लोकनेते, क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपले यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय मातंग संघ व समस्त समाज बांधवांच्या आयोजनातून रविवार, ७ जुलै रोजी दुपारी १ वाजता स्थानिक हिंगोली रस्त्यावरील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये बहूजन मातंग मेळावा व गुणवंत गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ.भा. मातंग संघाच्या राष्ट्रीय नेत्या क्रांतीज्योती कुसूमताई गोपले ह्या असतील. कार्यक्रमाचे उद्घाटन नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख हे करतील. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून अभियंता राजु मानमोठे, माजी जि.प. अध्यक्षा सौ. सोनाली जोगदंड (लांडगे), अ.भा. मातंग संघाचे राज्य कार्याध्यक्ष संजय वैरागडे, भारतीय बहूजन आघाडीच्या विदर्भ अध्यक्षा श्रीमती बायडाबाई कांबळे, दलित पँथरचे केंद्रीय अध्यक्ष भाई जगदीशकुमार इंगळे, अण्णाभाऊ साठे महासंघाचे संयोजक चंद्रकांत साठे यांची उपस्थिती राहील. तर प्रमुख पाहुणे म्हणून लसाकमचे जिल्हाध्यक्ष आनंद सुतार, अण्णाभाऊ साठे पुरस्कारप्राप्त चंद्रभान पौळकर, अ.भा. मातंग संघाचे विदभ अध्यक्ष माणिकराव बांगर, राष्ट्रीय लहुशक्तीचे विदर्भ विभागीय अध्यक्ष रविकुमार कांबळे, डेमोक्रेटीक पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष इंगळे, भारतीय बहूजन आघाडी हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष भानुदास खंदारे, सामाजीक कार्यकर्ते शाम उफाडे, पंकज गायकवाड, माजी जि.प. सदस्य विजय मानमोठे, कैलास रणशिंगे, व्यसनमुक्ती प्रबोधनकर्ते शालीकराम लगड, अ‍ॅड. प्रशांत कोंगे, अ.भा. मातंग संघाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष सोपानराव रणबावळे, सेवानिवृत्त पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. रमेश चंदनशिव, ब्ल्यु टायगर सेनेचे अध्यक्ष जगदिश मानवतकर, स्त्री अब्रुरक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिपक भालेराव, बाबासाहेब गोपले सेनेचे जिल्हाध्यक्ष वसंतराव गायकवाड, मानवी हक्क अभियानाचे जिल्हाध्यक्ष संतोष लोखंडे, समाजभूषण पुरस्कारप्राप्त भगवान पिसोळे, आयटकचे जिल्हा सहसचिव संजय बाजड, सामाजीक कार्यकर्ते जगदिश ताकतोडे, विजय लोंढे, मानवहित लोकशाही पक्षाचे गजानन खंदारे, लहुजी शक्ती सेनेचे राज्य सदस्य कैलास थोरात, अ‍ॅड. विजय कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्थेचे अध्यक्ष आत्माराम सुतार, मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे, मातंग संघाचे मराठवाडा सरचिटणीस आनंद शिखरे, रामेश्वर भ. पाटोळे, नारायण डाखोरे, मानवी हक्क सुरक्षा दलाचे विदर्भ अध्यक्ष भागवत कांबळे, पत्रकार यशवंत हिवराळे, सेनि. बिएसएफ गोपाल आवारे आदींची प्रमुख उपस्थिती राहील. दरम्यान सावरगाव जिरे येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे गायन पार्टीचा सांस्कृतीक कार्यक्रम सादर करण्यात येईल. तरी या कार्यक्रमाला समाजबांधवांनी बहूसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अ.भा. मातंग संघाचे जिल्हाध्यक्ष आर. के. पाटोळे यांनी केले आहे.

Previous articleराजूशेठ पांगारकर यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा
Next articleजाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील भाविक अमरनाथ यात्रेसाठी रवाना
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.